Trending : 'कच्चा बदाम', 'बचपन का प्यार'पासून 'ढिंच्याक पूजा'पर्यंत 'हे' कलाकार रातोरात झाले स्टार
Kacha Badam : 'बदाम... बदाम... कच्चा बदाम' गाणे गात शेंगदाणे विकणाऱ्या भुवन बडायकर सारखे अनेक कलाकार रातोरात सेलिब्रिटी झाले आहेत.
Trending Song : अनेक कलाकारांना सोशल मीडियामुळे लोकप्रियता मिळत आहे. त्यामुळे हे कलाकारमंडळी रातोरात सेलिब्रिटी झाले आहेत. अशा रातोरात सेलिब्रिटी होणाऱ्या कलाकारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीशिवाय हे कलाकार रातोरात स्टार झाले आहेत. सध्या 'बदाम... बदाम... कच्चा बदाम' गाणे गात शेंगदाणे विकणारा भुवन बडायकर चर्चेत आहे. भुवन शेंगदाणे विकताना 'बदाम... बदाम... कच्चा बदाम' असं त्याच्या शैलीमध्ये गायचा. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता त्याला अनेक ऑफर्स मिळू लागल्या आहेत.
2021 मध्ये सोशल मीडियावर सहदेव दिरदोचा बोलबाला होता. सहदेवने 2019 साली त्याच्या शाळेत 'बचपन का प्यार' हे गाणं म्हटलं होतं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे सहदेव रातोरोत स्टार झाला.
मनोरंजनसृष्टीसह संगीत क्षेत्रात नाव कमवायचे असेल तर अनेक वर्षांच्या मेहनतीबरोबरच ताल, सूर आणि लय यातही परिपूर्ण असावं लागतं. तर दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी नाव कमावलं आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे ढिंच्याक पूजा. 2017 सालापासून ढिंच्याक पूजा तिच्या गाण्यामुळे लोकप्रिय झाली आहे. तिचा चाहतावर्गदेखील दिवसेंदिवस वाढत आहे.
2019 मध्ये गाणकोकिळा लता मंगेशकरांचे 'प्यार का मगमा' गाणे गात रानू मंडल रातोरात स्टार झाली. रेल्वे स्टेशनवर गाणे गाणाऱ्या रानू मंडलचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. त्यानंतर तिने थेट हिमेश रेशमियाच्या स्टुडिओमध्ये तीन गाणी रेकॉर्ड केली.
संबंधित बातम्या
Pawankhind : जय शिवराय! दुसऱ्या आठवड्यातही 'पावनखिंड' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कोट्यवधींची कमाई
Dhaakad : कंगना रनौतच्या अॅक्शन थ्रिलर 'धाकड'ची रिलीज डेट जाहीर
25 Years Of Judaai : श्रीदेवीसोबत काम करायचे नव्हते, अनिल कपूरने ‘जुदाई’साठी दिला होता नकार! वाचा किस्सा...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha