एक्स्प्लोर

Jhund : ...जेव्हा ‘महानायक’ प्रत्यक्ष भेटले! रिंकू-आकाशने शेअर केला ‘झुंड’चा अनुभव

Jhund Movie : अभिनेत्री रिंकू राजगुरू या चित्रपटात ‘मोनिका’ ही भूमिका साकारत आहे. तर, अभिनेता आकाश ठोसर यात ‘संभ्या’ हे पात्र साकारणार आहे.

Jhund : बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या आगामी ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळतेय. या चित्रपटात ‘सैराट’ जोडी रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि आकाश ठोसरदेखील (Akash Thosar) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या निमित्ताने दोघांनीही आपला या चित्रीकरणाचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ज्यांना आपण लहानपणापासून पडद्यावर पाहतो, त्यांच्यासोबत काम करताना नेमकं काय वाटलं हे त्यांनी शब्दांत व्यक्त केलं आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरू या चित्रपटात ‘मोनिका’ ही भूमिका साकारत आहे. तर, अभिनेता आकाश ठोसर यात ‘संभ्या’ हे पात्र साकारणार आहे.

अनुभव खूप काही शिकवणारा होता : आकाश ठोसर

महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव शेअर करताना आकाश म्हणतो, ‘मी लहानपणापासून त्यांचा चाहता होतो. त्यांचं जुम्मा चुम्मा गाणं ऐकल्यापासून मी त्यांना चुम्मा या नावानेच ओळखायचो. बाबादेखील मला सांगायचे की, अमुक अमुक गोष्ट पूर्ण कर, मग तुला चुम्माचा चित्रपट दाखवेन. त्यांना पाहतच मी लहानाचा मोठा झालो. त्यांच्यासोबत काम करताना खूप भीती वाटत होती. पण मग, नागराज अण्णांनी समजावलं आणि मी भीती बाजूला ठेवून चित्रपट पूर्ण केला.’ अर्थात हा किस्सा त्याने अमिताभ बच्चन यांना सांगितला नाही. मात्र, हा चित्रपट करताना खूप काही शिकायला मिळाल्याचं आकाश ठोसर म्हणाला.

मी चाहती आहे हे जाणूनबुजून विसरले : रिंकू राजगुरू

बिग बींसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना रिंकू म्हणाली की, ‘आपण सगळेच त्याने चाहते आहोत. प्रत्येक चित्रपटप्रेमीचे ते आवडते आहेत. त्यांच्यासोबत काम करताना साहजिकच दडपण होतं. पण, त्यावेळेस काम देखील खूप महत्त्वाचं होतं. अशावेळी मी चाहती आहे विसरून, एक अभिनेत्री असण्याचे कर्तव्य पहिला निभावले. भीती बाजूला सारून मी त्यांच्यासोबतचे सीन पूर्ण केले. अर्थात या सगळ्यात मला अनेकांची मदत झाली.’

‘झुंड’ हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन हे निवृत्त क्रीडा शिक्षक विजय बारसे यांची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. विजय बारसे हे रस्त्यावरील मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी आणि संघ तयार करण्यास प्रोत्साहित करतात. ते स्लम सॉकरचे संस्थापक देखील आहेत. या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करत आहेत. ‘झुंड’ची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज यांनी केली आहे. अजय-अतुल या लोकप्रिय जोडीने संगीताची धुरा सांभाळली आहे. हा चित्रपट 4 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget