DIDLM 5 : 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर 5' चा प्रोमो रिलीज, मौनी रॉयसह 'ही' अभिनेत्री असणार परिक्षक
Dance India Dance Little Master 5 : 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर 5' चा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या कार्यक्रमाचे परीक्षण मौनी रॉय, सोनाली बेंद्रे आणि रेमो डिसूजा करणार आहेत.
Dance India Dance Little Master 5 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर'चा (Dance India Dance Little Master) नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज झाला आहे. मौनी रॉय (Mouni Roy), सोनाली बेंद्रे आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझा या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहे.
'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर 5' चा प्रोमो रिलीज झाल्याने प्रेक्षक आता या कार्यक्रमाची प्रतीक्षा करत आहेत. प्रोमोमध्ये मौनी रॉय, सोनाली बेंद्रे आणि रेमो डिसूझा डान्स करताना दिसत आहेत. बिग बॉस 15 फेम जय भानुशाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. हा कार्यक्रम 12 मार्चपासून दर शनिवारी आणि रविवारी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
View this post on Instagram
मौनीचे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. मौनी पाच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. याआधी ती एकता कपूरच्या 'नागिन'मध्ये मुख्य भूमिकेत दिसून आली होती. लवकरच ती दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमात दिसणार आहे.
संबंधित बातम्या
सिद्धार्थचं सत्य समोर येणार, तर ‘देवमाणूस’ पोलिसांच्या जाळ्यात अडकणार! रविवारी प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार!
Varun Dhawan : वरूण धवननं शेअर केला खास फोटो ; नेटकरी म्हणाले, 'नऊ दिवस आंघोळ केली नाही....'
Mumbai : पोलिसांना मारहाण प्रकरणी एका अभिनेत्रीला अटक ; न्यायालयीन कोठडी सुनावली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha























