Mumbai : पोलिसांना मारहाण प्रकरणी एका अभिनेत्रीला अटक ; न्यायालयीन कोठडी सुनावली
Mumbai : काव्या प्रवीण थापर (Kavya Thapar Praveen) या अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे.
Kavya Thapar Praveen : पोलिसांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी जुहू पोलिसांनी दाक्षिणात्य चित्रपटातील काव्या प्रवीण थापर (Kavya Thapar Praveen) या अभिनेत्रीला अटक केली आहे. कलम 353, 332, 504, 427 अंतर्गत तिला अटक करण्यात आली आहे. ही घटना काल (17 फेब्रुवारी) सकाळी घडली. काव्या प्रवीण थापर ही अंधेरी न्यायालयात हजर झाली होती.
मुंबई पोलिस झोन नऊचे पोलिस उपायुक्त मंजूनाथ शिंगे यांनी एबीपी न्यूजला माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, 'पोलिस कंट्रोल रूमला फोन आला की अपघात झाला आहे आणि एक महिला गोंधळ घालत आहे. त्यानंतर लगेच निर्भया पथक आणि इतर पथक घटनास्थळी पोहोचले. जिथे काव्याने एका महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत शिवीगाळ केली आणि नंतर तिची कॉलर पकडली. तसेच काव्यानं मारहाण देखील करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तिला ताब्यात घेऊन जुहू पोलीस ठाण्यात नेले.'
रिपोर्टनुसार, काव्याच्या गाडीचा अपघात हा जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेल समोर झाला होता. काव्या तिथे लोकांसोबत भांडण करत होती. तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Maharashtra | Actress Kavya Thapar was arrested & sent to judicial custody, on charges of engaging in a scuffle & using abusive language with the police, after she hit a car & injured a person under the influence of alcohol, yesterday morning: Juhu Police
— ANI (@ANI) February 18, 2022
संबंधित बातम्या :
- Disha Patani : 80 किलो वजन उचलून दिशाचं वर्कआऊट; टायगरची बहिण आणि आई म्हणाली...
- Madhuri Dixit : 'हे' गाणं पाहण्यासाठी माधुरी बुरखा घालून गेली चित्रपटगृहात ; सांगितला किस्सा
- Rashmika Mandanna-Vijay Deverakonda : विजय देवरकोंडासोबत जोडलं जातंय रश्मिकाचं नाव ; लग्नाबाबत नॅशनल क्रश म्हणाली...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha