Prithvi Shaw Engagement With Girlfriend Akriti Agarwal: इकडे टीम इंडियानं विश्वचषक उंचावला अन् तिकडे प्रसिद्ध क्रिकेटरनं दिली गूड न्यूज; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
Prithvi Shaw Engagement With Girlfriend Akriti Agarwal: टीम इंडियाचा सलामीवीर पृथ्वी शॉनं त्याची गर्लफ्रेंड आकृती अग्रवालसोबत साखरपुडा केला आहे. बऱ्याच दिवसापासून पृथ्वी आणि आकृती एकमेकांना डेट करत होते.

Prithvi Shaw Engagement With Girlfriend Akriti Agarwal: टीम इंडियानं (Team India) वर्ल्डकपवर (T20 World Cup) आपलं नाव कोरलं आणि देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय. एकीकडे टीम इंडियानं टी20 विश्चचषकाची ट्रॉफी उंचावली आणि दुसरीकडे टीम इंडियाच्या शिलेदारानं आपल्या लॉन्ग टाईम गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा (Prithvi Shaw Engagement With Girlfriend Akriti Agarwal) उरकला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर पृथ्वी शॉनं त्याची गर्लफ्रेंड आकृती अग्रवालसोबत साखरपुडा केला आहे. बऱ्याच दिवसापासून पृथ्वी आणि आकृती एकमेकांना डेट करत होते.
पृथ्वी शॉ बऱ्याच काळापासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे. त्यानं शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 25 जुलै 2021 रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. पृथ्वी शॉनं त्याचं सोशल मीडिया अकाउंट, इंस्टाग्रामवर आकृतीसोबतचे फोटो शेअर केले आणि साखरपुडा झाल्याची गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. पृथ्वी शॉनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "मैदानावर षटकार मारण्यापासून ते आयुष्यभराच्या शानदार खेळीपर्यंत... ती माझी परिपूर्ण खेळी..."
पृथ्वीच्या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. तर, पृथ्वी शॉ आणि आकृतीचं अभिनंदन करत आहेत. फोटोंमध्ये पृथ्वी शॉ आणि आकृती खूप आनंदी आहेत. दरम्यान, पृथ्वीनं यापूर्वीही अनेकदा त्याच्या इंस्टाग्रामवर आकृतीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. एवढंच नाहीतर त्यांनी काही रिलही शूट केलेले.
पृथ्वी शॉची होणारी बायको आकृती अग्रवाल इन्फ्लुएन्सर असून तिचे इंस्टाग्रामवर 32 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. आकृती एक अभिनेत्री आहे आणि लवकरच ती 'त्रिमुखा' या तेलुगू सिनेमातून पडद्यावर पदार्पण करणार आहे. आकृती तिच्या इंस्टाग्रामवर फॅशन, लाईफस्टाईल आणि डान्सशी संबंधित रील शेअर करत असते.
View this post on Instagram
पृथ्वी शॉनं आतापर्यंत टीम इंडियासाठी पाच टेस्ट, सहा वनडे आणि एक टी-20 सामने खेळले आहेत. या काळात त्यानं एकूण 528 धावा केल्या आहेत. त्यानं टेस्टमध्ये एक सेंच्युरी आणि दोन हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. पृथ्वी शॉ बराच काळ भारतीय क्रिकेट संघाबाहेर आहे. आयपीएल 2026 च्या मेगा लिलावाच्या पहिल्या दोन राउंडमध्ये पृथ्वी शॉवर कोणीही बोली लावली नाही.
दरम्यान, अखेर दिल्ली कॅपिटल्सनं त्याला 75 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर विकत घेतलंय. आयपीएल 2025 मध्ये शॉ कोणत्याही संघाचा भाग नव्हता. आयपीएल 2024 मध्ये शॉची कामगिरी विशेष प्रभावी नव्हती. त्यानं आठ सामन्यांमध्ये 24.75 च्या सरासरीनं फक्त 198 धावा केल्या. दरम्यान, पृथ्वी शॉनं स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघालाही सोडलंय. तो या सीझनमध्ये महाराष्ट्राकडून खेळलाय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















