Varun Dhawan : वरूण धवननं शेअर केला खास फोटो ; नेटकरी म्हणाले, 'नऊ दिवस आंघोळ केली नाही....'
Varun Dhawan : काही नेटकऱ्यांनी वरूण धवनच्या या पोस्टला विनोदी कमेंट्स केल्या आहेत.
Varun Dhawan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरूण धवनचा (Varun Dhawan) चाहता वर्ग मोठा आहे. वरूण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करतो. वरूण त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतो नुकताच वरूणनं त्याचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वरूण समुद्र किनाऱ्यावर हटके पोज देताना दिसत आहे. ब्लॅक शॉर्ट आणि गॉगल अशा लूकमध्ये वरूण दिसत आहे. त्याच्या या फोटोला कमेंट करून काहींनी त्याच्या फिटनेसचे कौतुक केले. पण काही नेटकऱ्यांनी मात्र विनोदी कमेंट्स केल्या आहेत.
नेटकऱ्यांच्या हटके कमेंट्स
एका नेटकऱ्यानं कमेंटमध्ये लिहिले, 'निट पाहा वरूणनं नऊ दिवस आंघोळ केलेली नाही,' तर एका यूझरनं लिहिलं, 'सर तुम्ही पाण्याच्या आत जात आहात की बाहेर जात आहात?'
View this post on Instagram
लवकरच वरूणचा जुग जुग जियो हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात वरूणसोबतच अभिनेत्री कियारा अडवाणी आणि नीतू सिंह हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
हेही वाचा :
Disha Patani : 80 किलो वजन उचलून दिशाचं वर्कआऊट; टायगरची बहिण आणि आई म्हणाली...
Madhuri Dixit : 'हे' गाणं पाहण्यासाठी माधुरी बुरखा घालून गेली चित्रपटगृहात ; सांगितला किस्सा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha