Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात रंगणार अतरंगी टास्क; घरातील एका सदस्याची होणार एक्झिट
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसमध्ये आज घरातील एका सदस्याला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे.
Bigg Boss Marathi 4 : मराठी बिग बॉसचा (Bigg Boss Marathi 4) खेळ अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. हिंदी बिग बॉसप्रमाणेच मराठी बिग बॉसचीही चर्चा प्रेक्षकांमध्ये जोरात रंगतेय. नुकतीच बिग बॉसमध्ये कॉलेज डेज ही साप्ताहिक थीम पार पडली. या साप्ताहिक कार्यात अनेक घरातील सदस्य घराच्या बाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले. आता आजच्या महेश मांजरेकर यांच्या बिग बॉसच्या चावडीत कोणता सदस्य घराबाहेर जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कालच्या भागात चावडीवर प्रसाद जवादेला महेश मांजरेकर यांनी खूप सुनावले. तसेच घरातील इतर सदस्यही प्रसादची तक्रार करताना दिसले. त्याचप्रमाणे, इतर सदस्यांचीही यावेळी चांगलीच शाळा घेण्यात आली.
कोण आहे खरा गद्दार?
यावेळी घरातील सदस्यांना एक टास्क देण्यात येतो. या टास्कमध्ये सदस्यांना कोणता सदस्य गद्दार वाटतो किंवा त्याने गद्दारी केली हे सांगायचे आहे आणि त्या सदस्याला बॅच लावायचा आहे. त्यानुसार सगळे सदस्य एकमेकांना जो गद्दार वाटतो त्या सदस्याला बॅच लावतात. मात्र, या टास्कमध्ये एक गोष्ट घडते ज्यामुळे घरातील सर्वच सदस्य अचंबित होतात. खरंतर, विकास पाटील हा घरातील मास्टरमाईंड म्हणून ओळखला जातो. बिग बॉसचा या घरात किरण मानेवर पूर्ण विश्वास आहे असं तो वारंवार सांगतो. मात्र, या टास्क दरम्यान विकासने किरण मानेलाच गद्दारचा बॅच दिला. त्यामुळे घरातील सदस्य यावर शॉक झाले.
बिग बॉस मराठीच्या घरात नेहमीच सदस्यांना वेगवेगळे अतरंगी टास्क देण्यात येतात. या टास्कमध्ये काही सदस्य अगदी नाव कमावून जातात. तर, काही सदस्य लक्षातच राहत नाहीत. अशाच अनेक टास्कमध्ये चांगली कामगिरी केलेला घरातील सदस्य म्हणजे रोहित शिंदे. नुकत्याच पार पडलेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये रोहित शिंदे दुसऱ्यांदा घराचा कॅप्टन झाला आहे.
'हे' आहेत नॉमिनेट झालेले सदस्य
या आठवड्यात झालेल्या साप्ताहिक कार्यानुसार जे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. या सदस्यांमध्ये अमृता देशमुखे, अमृता धोंगडे, प्रसाद जवादे, तेजस्विनी लोणारी, स्नेहलता वसईकर आणि रूचिरा जाधव हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यापैकी कोणता सदस्य घराबाहेर जाईल हे बिग बॉसच्या आजच्या भागात कळेल.
महत्वाच्या बातम्या :