Vishal Nikam : 'धीर धरा... मला थोडा वेळ द्या'; बिग बॉस विजेता विशाल निकमची पोस्ट चर्चेत
Vishal Nikam Social Media Post : विशाल निकमनं सोशल मीडियावर नुकतीच पोस्ट शेअर केली आहे.
Bigg Boss Marathi 3 Winner Vishal Nikam Social Media Post : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनचा (Bigg Boss Marathi 3) अभिनेता विशाल निकम (Vishal Nikam) हा विजेता ठरला. विशालच्या चाहत्यांनी विशालवर शुभेच्छांचा वर्षाव केला. बिग बॉसच्या घरात असताना अनेकवेळा विशाल सौंदर्या नावाच्या मुलीचा उल्लेख करत होता. ही सौंदर्या नेमकी कोण आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण आता सौंदर्याबाबत विशालनं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून विशालनं त्याच्या लोकांना विनंत केली आहे.
विशाल निकमची पोस्ट
विशाल निकमनं पोस्टमध्ये लिहिले, 'मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, योग्य वेळ आल्यावर आणि काही खाजगी गोष्टी सुरळीत झाल्यावर मी स्वत:हून सौंदर्या चं नाव सांगेल. ती एक समान्य मुलगी असून, अभिनय क्षेत्रासोबत तिचा काही एक संबंध नाही, त्यामुळे इंडस्ट्रीतील कोणत्याही व्यक्तीसोबत माझं नाव कृपया जोडू नका. कारण यामुळे विनाकारण त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. प्लीज धीर धरा. मला वेळ द्या. '
View this post on Instagram
विशाल हा मुळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील देवीखिंडी गावचा आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या मिथुन या चित्रपटामध्ये विशालने महत्वाची भूमिका साकारली. 'साता जल्माच्या गाठी' या मालिकेतील विशालच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेमुळे विशालला लोकप्रियता मिळाली. तसेच 'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेमध्ये देखील विशालने महत्वाची भूमिका साकारली.
संबंधित बातम्या
Naay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha : महिला आयोगाच्या तक्रारीनंतर 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' चा ट्रेलर सोशल मीडियावरून हटवला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीSamantha, पाहा लाईव्ह - ABP Majha