(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mahesh Manjrekar Movie : वादानंतर 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' बाबत मोठा निर्णय; महेश मांजरेकरांकडून माहिती
सर्व वादावर महेश मांजरेकांनी (Mahesh Manjrekar) प्रतिक्रिया दिली आहे.
Mahesh Manjrekar Movie Naay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या (Mahesh Manjrekar) 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' (Naay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha)हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलर विरोधात महिला आयोगाने या चित्रपटाविरोधात तक्रार नोंदवली. त्यांचे असे मत होते की ट्रेलरमध्ये आक्षेपार्ह दृश्यं दाखविण्यात आली आहेत. महिला आयोगाने तक्रार केल्यामुळे या चित्रपटाचा ट्रेलर सर्व प्लॅटफोर्मवरून हटवण्यात आला आहे. आता या सर्व वादावर महेश मांजरेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली, 'या चित्रपटाच्या प्रोमेमधील काही दृष्यांवर समाजातील काही घटकांनी आक्षेप घेतला असला तरी कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नव्हता. समाजातून उमटणाऱ्या भावनांचा मान राखत आम्ही या चित्रपटाच्या प्रोमोमधून आक्षेपार्ह वाटणारी सर्व दृष्ये काढून टाकली आहे. तसेच हा प्रोमो सर्व ठिकाणांवरून काढण्यात आला असून सुधारित प्रोमो सर्वांना पाठवण्यात आला आहे. ' आक्षेपार्ह दृष्ये ही केवळ प्रोमोमधूनच नाही तर चित्रपटामधून देखील वगळण्यात आल्याचे महेश मांजरेकरांनी सांगितले आहे.
14 जानेवारीला 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. परंतू ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या आक्षेपार्ह दृष्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगानं या चित्रपटाचा विरोध करत केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे तक्रार केली.
संबंधित बातम्या
Deepika Padukone : ...म्हणून शूटिंग सेटवर दीपिका घेऊन जाते रंगीत पेन्सिल बॉक्स!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीSamantha, पाहा लाईव्ह - ABP Majha