एक्स्प्लोर

Bhau Kadam : 'चला हवा येऊ द्या'चा TRP का घसरला? भाऊ कदमने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला,स्क्रिप्ट एवढी वर्षे एकच माणूस लिहित...

Bhau Kadam : प्रेक्षकांनी चला हवा येऊ द्या कार्यक्रमाकडे पाठ का फिरवली यावर भाऊ कदमने भाष्य केलं आहे.

Bhau Kadam :  झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) कार्यक्रमाने जवळपास 10 वर्ष प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन केलं. प्रत्येक कलाकाराच्या विनोदी शैलीने अनेकांची मनं जिंकलीत. त्याचमुळे कार्यक्रमाला सलग 10 वर्ष प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण काही महिन्यांपूर्वीच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. अगदी शेवटच्या काळात कार्यक्रमाचा टीआरपी हा पूर्ण घसरला. त्यामुळे हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण कार्यक्रमाचा टीआरपी का घसरला? याकडे प्रेक्षकांनी पाठ का फिरवली? यावर भाऊ कदमने (Bhau Kadam) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. 

भाऊ कदमने नुकतच रेडीओ सिटी मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये भाऊ कदमने यावर भाष्य केलं आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला सुरुवातीला खूप यश मिळालं पण काही काळानंतर कार्यक्रमाचा टीआरपी घसरला. या सगळ्या गोष्टींचा काही आयुष्यावर काही परिणाम झाला? यावर भाऊ कदमने म्हटलं की, याचा आयुष्यावर काही परिणाम झाला असं नाही. पण या सगळ्याचा मी एक विचार केला. 

स्क्रिप्ट एवढी वर्षे एकच माणूस लिहित आलाय - भाऊ कदम

भाऊ कदमने म्हटलं की, मी या सगळ्या गोष्टींचा एका वेगळ्या पद्धतीने विचार केलाय. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची स्क्रिप्ट इतकी वर्ष एकच माणूस लिहित आलाय. जसा आमचा कार्यक्रम तसे दुसऱ्या चॅनलवरही कॉमेडी शो सुरु होता. पण तिथे प्रत्येक स्क्रिप्टचे लेखक वेगवेगळे होते. त्यामुळे त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीमध्ये व्हेरिएशन्स होते. आमच्याकडे एकच माणूस लिहित असल्यामुळे त्यामध्ये किती व्हेरिएशन येणार? आता आपण केलेलं सगळंच हिट होतं असं नाही. कोणतीच प्रक्रिया अशी नसते. आपण केलेली प्रत्येक गोष्ट जशी हिट होत नाही अगदी तसंच आपलं प्रत्येक स्किट वाजेलच असं नाही. कुठेतरी अपयश ही यशाची पायरी असते. त्यामुळे खाली आल्यावरच आपण पुन्हा वर जातो, यातही एक वेगळी मजा येते.

प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला कार्यक्रम

'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. डॉक्टर निलेश साबळे (Nilesh Sable), भाऊ कदम (Bhau Kadam), सागर कारंडे (Sagar Karande), श्रेया बुगडे (Shreya Bugde), कुशल बद्रिके (Kushal Badrike), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure), अंकुर वाढवे हे विनोदवीर या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहेत. थुकटरवाडी, पोस्टमन, 'होऊ दे व्हायरल','सेलिब्रिटी पॅटर्न','लहान तोंडी मोठा घास' असे अनेक पर्व, मराठीसह बॉलिवूड सिनेमाचं प्रमोशन अशा अनेक गोष्टींची प्रेक्षकांना आता आठवण येईल.

ही बातमी वाचा : 

'नो एन्ट्री'च्या सिक्वेलमध्ये नव्या हिरो-हिरोईनची 'एन्ट्री', सलमान, अनिल कपूरने ऑफर नाकारली; नवे चेहरे कोण असणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Embed widget