'नो एन्ट्री'च्या सिक्वेलमध्ये नव्या हिरो-हिरोईनची 'एन्ट्री', सलमान, अनिल कपूरने ऑफर नाकारली; नवे चेहरे कोण असणार?
लवकरच नो एन्ट्री- 2 या चित्रपटाचे शूटिंग चालू होणार आहे. या चित्रपटात अनेक नवे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटात सलमान खान, अनिल कपूर नसतील.
No Entry 2: कोणताही चित्रपट हिट होण्यासाठी सलमान कान हे एक नाव पुरेसं आहे. हा अभिनेता ज्या चित्रपटात असतो तो सुपरहिट ठरतोच. 2005 साली याच अभिनेत्याची मुख्य भूमिका असलेला नो एन्ट्री हा चित्रपट आला होता. आता याच चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा झाली आहे. मात्र नो एन्ट्री-2 मध्ये सलमान खान दिसणार नाही. सोबतच अभिनेता अनिल कपूरही या चित्रपटात दिसणार नाही. त्यामुळे आता नो एन्ट्री-2 मध्ये संपूर्ण कास्टिंग ही नवी असणार आहे.
सलमान, अनिल कपूर, फरदीन खान नसणार
2005 साली आलेल्या नो एन्ट्री या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. हा एक विनोदपट होता. त्यामुळे सलमान खान, अनिल कपूर, बिपाशा बासू या दिग्गज अभिनेत्यांनी सिनेरसिकांनी खळखळून हसवलं होतं. दरम्यान, आता याच चित्रपटाच्या पुढच्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. या दुसऱ्या भागात मात्र सलमान, अनिल कपूर, फरदीन खान हे कलाकार नसणार आहेत. तर नो एन्ट्री-2 या चित्रपटात कलाकारांची नवी फळी दिसणार आहे. या चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर यांनीच याबाबत माहिती दिली आहे.
नो एन्ट्री-2 चित्रपट कधी रिलिज होणार?
बोनी कपूर यांनी सांगितल्यानुसार नो एन्ट्री-2 हा चित्रपट 2025 साली दिवाळीत रिलिज केला जाणार आहे. त्यासाठीची तयारीदेखील चालू करण्यात आली आहे. या चित्रपटासाठी कथा तयार असून पुढील प्रक्रियेला वेग आलेला आहे. 'नो एन्ट्री-2 या चित्रपटात जुनेच कलाकार असावेत यासाठी खूप प्रयत्न केला. खूप वेळ वाटही पाहिली. पण नो एन्ट्री-1 या चित्रपटात भूमिका साकारलेल्या अनेक कलाकारांनी हा याच्या सिक्वेलमध्ये काम करण्यास नकार दिलेला आहे. प्रत्येकाने वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. त्यांनी दिलेल्या कारणांचा मला आदरच आहे. त्यामुळे आता नो एन्ट्री-2 या चित्रपटात नवे चेहरे दिसतील, असे बोनी कपूर यांनी सांगितले.
नो एन्ट्री-2 चित्रपटाची कथा असेल दमदार
नो एन्ट्री-2 या चित्रपटाची कथा ही दमदार असून ज्यांनी-ज्यांनी ती वाचलेली आहे, त्या सर्वांनाच आवडली आहे. अनेकांना तर नो एन्ट्री-1 या चित्रपटाच्या कथेपेक्षा नो एन्ट्री-2 चित्रपटाचीच कथा जास्त आवडली आहे, असे सांगत प्रेक्षकांनाही हा चित्रपट नक्की आवडेल, असा विश्वास बोनी कपूर यांनी व्यक्त केला आहे.
दिवाळीला होणार चित्रपट रिलीज
बोनी कपूर यांनी सांगितल्याप्रमाणे या चित्रपटाची शूटिंग 2025 सालातील जुलै महिन्यात चालू होईल. त्यानंतर 26 ऑक्टोबर 2025 पर्यंत म्हणजेच दिवाळीपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे आमचे टार्गेट असेल, असे सांगितले. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर पोस्ट प्रोडक्शनमध्येही बरेच काम असते. त्यामुळे हे सगळे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे बोनी कपूर यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार नो एन्ट्री-2 या चित्रपटात अभिनेता वरुण धवन, दिलीजत दोसांझ आणि अर्जुन कपूर यासारखे बडे चेहरे दिसणार आहेत. या चित्रपटाला अनीस बज्मी दिग्दर्शित करतील. या चित्रपटात अभिनेत्री कोण असेल हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
हेही वाचा :
निळ्याशार समुद्रात अवतरली सुंदरी, 23 वर्षांच्या अवनीतच्या ब्लू ड्रेसमधील फोटोंची चर्चा!
विजय-रश्मिका एकत्र करणार न्यू ईयरचं सेलिब्रेशन? पुष्पाची श्रीवल्ली बॉयफ्रेंडसोबत दिसली अन्...