Sushmita Sen : गॉगलमध्ये काय दिसतंय? सुष्मिताला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
सुष्मितानं नुकताच एक सेल्फी शेअर केला. या सेल्फीमधील सुष्मिताच्या गॉगलमध्ये दिसणाऱ्या एका वस्तूनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Sushmita Sen : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून ललित मोदीनं (Lalit Modi) शेअर केलेल्या डेटिंगच्या पोस्टमुळे चर्चेत आहे. सुष्मिता ही सोशल मीडिया अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो सुष्मिता शेअर करत असते. सुष्मितानं नुकताच एक सेल्फी शेअर केला. या सेल्फीमधील सुष्मिताच्या गॉगलमध्ये दिसणाऱ्या एका वस्तूनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सेल्फीमध्ये काय दिसलं?
सुष्मितीनं शेअर केलेल्या सेल्फीमध्ये ती एका कारमध्ये बसलेली दिसत आहे. हा सेल्फी सुष्मितानं इन्स्टाग्रामवर आणि ट्वीटरवर शेअर केला आहे. सुष्मिताचा हा फोटो व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये सुष्मितानं गॉगल आणि ब्लू कलरचा टॉप अशा लूकमध्ये दिसत आहे. सुष्मिताच्या गॉगलमध्ये दिसणाऱ्या एका वस्तूमुळे सध्या सुष्मिताला नेटकरी ट्रोल करत आहेत. सुष्मिताच्या गॉगलमध्ये दोन बॉटल्स दिसत आहेत. एका नेटकऱ्यानं तिच्या फोटोला कमेंट करत लिहिलं, 'वोडका आहे का?' तर दुसऱ्यानं कमेंट केली, 'सेल्फीमध्ये दोन शॅम्पियनच्या बॉटल्स दिसत आहे.' अशा कमेंट्स करुन नेटकरी सुष्मिताला ट्रोल करत आहेत.
🤗❤️😇I love you guys!!! pic.twitter.com/UqOe0g2nzS
— sushmita sen (@thesushmitasen) July 20, 2022
Ma'am ye vodka hai? pic.twitter.com/q2ua5ycvuF
— Kaajukatla (@kaajukatla) July 20, 2022
सुष्मितानं शेअर केली पोस्ट
ललित मोदीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर सुष्मितानं देखील पोस्ट शेअर केली होती. "मी सध्या आनंदी आहे. मी लग्न केलेलं नाही. साखरपुडा देखील केला नाही. सध्या मी प्रेमळ माणसांच्या सानिध्यात आहे. हे माझं स्पष्टीकरण, आता तुम्ही स्वत:चं आयुष्य जगा आणि काम करा. माझा आनंद शेअर केल्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी शेअर केला नाही त्यांच्यासाठी 'None of Your Business", असं कॅप्शन सुष्मितानं या पोस्टला दिली आहे. सुष्तिताच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
हेही वाचा:
- Sushmita Sen First Reaction : ललित मोदींच्या पोस्टनंतर सुष्मिताची पहिली रिअॅक्शन; म्हणाली...
- Sushmita Sen : एकीकडे रिलेशनशिपची चर्चा, तर दुसरीकडे ट्रोलर्सचा हंगामा! सुष्मिता सेन फोटो शेअर करत म्हणतेय...