एक्स्प्लोर

Sushmita Sen : एकीकडे रिलेशनशिपची चर्चा, तर दुसरीकडे ट्रोलर्सचा हंगामा! सुष्मिता सेन फोटो शेअर करत म्हणतेय...

Sushmita Sen : सुष्मिता सेन हिने सोशल मीडियावर स्वतःचा एक सुंदर आणि स्मायलिंग सेल्फी पोस्ट केला असून, ‘आय लव्ह यु गाईज’, असे कॅप्शन दिले आहे.

Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सध्या ललित मोदींसोबतच्या (Lalit Modi) नात्यामुळे चर्चेत आहे. नुकताच ललित मोदी यांनी एका ट्विटद्वारे त्यांच्या रिलेशनशिपचा खुलासा केला होता. त्याआधी या दोघांच्या नात्याबद्दल कोणालाच माहितीही नव्हती. ललित मोदींनी ट्विट करताच सोशल मीडियावर मीम्स बनायला सुरुवात झाली. अभिनेत्री सुष्मिता सेनला सतत ट्रोल केले जाऊ लागले. एकीकडे तिच्या रिलेशनशिपची चर्चा होती, तर दुसरीकडे ट्रोलर्स तिला प्रचंड ट्रोल करत होते. मात्र यावर आता सुष्मिताने सडेतोड उत्तर दिले आहे. सुष्मिताने स्वतःचा एक फोटो शेअर करून, एक खास मेसेजही दिला आहे.

सुष्मिता सेन हिने सोशल मीडियावर स्वतःचा एक सुंदर आणि स्मायलिंग सेल्फी पोस्ट केला असून, ‘आय लव्ह यु गाईज’, असे कॅप्शन दिले आहे. अर्थातच अभिनेत्रीने अतिशय प्रेमाने ट्रोलर्सची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोत सुष्मिता सेन खूप आनंदी दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद तिच्या प्रेमाचा पुरावा देत आहे.

पाहा पोस्ट :

या फोटोत अभिनेत्री सुष्मिता सेन हिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर, एका कारमध्ये बसून ती सेल्फी घेत आहे. तिच्या सुंदर हास्याने चाहतेही घायाळ झाले आहेत.

नेटकऱ्यांची अभिनेत्रीवर टीका

नुकतीच ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची जाहीर घोषणा केली. मात्र, अनेकांना दोघांचे हे नाते आवडलेले नाही. यामुळे दोघांनाही सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले गेले. काही लोकांनी तर सुष्मिताला ‘गोल्ड डिगर’ म्हणत, तिच्यावर टीका देखील केली. प्रेम नाही, तर सुष्मिता पैशांमुळे ललित मोदींसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. या सर्व प्रकारानंतर अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमीच तिच्या बेधडक स्वभावासाठी प्रसिद्ध होती. सुष्मिताबद्दल बोलताना अनेकदा असं म्हटलं जातं की, तिने तिचं आयुष्य नेहमी स्वतःच्या अटींवर जगलं आहे. एकीकडे सुष्मिता ट्रोल होत असली, तरी दुसरीकडे तिला तिच्या चाहत्यांकडून प्रेमही मिळत आहे. अनेक चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला आणि ललित मोदींसोबतचे नाते हा तिचा वैयक्तिक निर्णय असल्याचे म्हटले आहे. म्हणूनच, चाहत्यांचे आभार मानत सुष्मिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ही खास पोस्ट शेअर केली आहे.

संबंधित बातम्या

Sushmita Sen First Reaction : ललित मोदींच्या पोस्टनंतर सुष्मिताची पहिली रिअॅक्शन; म्हणाली...

Rajeev Sen On Sushmita Sen-Lalit Modi : बहीण ललित मोदींना डेट करतेय! सुष्मिताच्या भावानं सोडलं मौन; म्हणाला, 'मी काही बोलण्याआधी...'

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget