शाहिद कपूरची बहीण होणार 'या' अभिनेत्याची सून, समोर आला मेहंदी सोहळ्याचा व्हिडीओ
Shahid Kapoor Sister Wedding : शाहिद कपूरच्या बहिणीचा लग्नसोहळा आज पार पडणार आहे. या प्री-वेडिंगचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Shahid Kapoor Sister Wedding : अभिनेत्री सुप्रिया पाठक (Supriya Pathak) आणि पंकज कपूर (Pankaj Kapoor) यांची मुलगी सना कपूर (Sanah Kapur) लवकरच सीमा पाहवा (Seema Pahwa) आणि मनोज पाहवा अभिनेते (Manoj Pahwa) यांचा मुलगा मयंक पाहवाबरोबर (Mayank Pahwa) लग्नगाठ बांधणार आहे. महाबळेश्वरमध्ये आज हा भव्य लग्नसोहळा होणार आहे. मंगळवारी या जोडप्याच्या मेहंदी आणि हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या जोडप्याच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ढोलताशाच्या तालावर वधू-वरांचे स्वागत होत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. यावेळी सना गुलाबी पारंपारिक ड्रेसमध्ये दिसत आहे. त्याचवेळी मयंक तिचा हात धरून उभा आहे. या दोघांच्या लग्नाआधीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. सनाला मेहंदी लावणाऱ्या मेहंदी कलाकाराने मेहंदी सोहळ्याचा फोटोही शेअर केला आहे. या प्रसंगी सना फारंच आनंदी दिसत आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
सुप्रिया पाठक तिची बहीण रत्ना शाह पाठकबरोबर माथे ते चमक या गाण्यावर डान्स केला. यावेळी ढोलकांच्या तालावर महिलांनी चांगलीच धमाल केली. त्याच वेळी, वहिनी मीरा कपूर (Mira Kapoor) देखील मेहंदी सोहळ्यासाठी अतिशय सुंदर पद्धतीने तयार झाली. मीरा कपूरने इन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. सना कपूरने भाऊ शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि वडील पंकज कपूर यांच्याबरोबर 2015 मध्ये विकास बहलच्या 'शानदार' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्याची माहिती आहे. या चित्रपटात आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Radhe Shyam Trailer : बहुप्रतिक्षित प्रभासच्या 'राधे श्याम'चा दुसरा ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
- Sonakshi Sinha ,Salman Khan : सलमान आणि सोनाक्षीचा पार पडला विवाह सोहळा? फोटो होतोय व्हायरल
- Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागू शकते, 'हे' आहे कारण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha