बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच रुचिताने मागितली प्रेक्षकांची माफी, पोस्ट करत म्हणाली...
Ruchita Jamdar: घरातून बाहेर पडल्यानंतर रुचीताने पोस्ट करत प्रेक्षकांची माफी मागितलीय. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात काल धक्कादायक एलिमिनेशन झालं. top 5 मध्ये जाईल असं वाटत असताना रुचिता जामदारला घरातून बाहेर पडावं लागेल. नॉमिनेशनमध्ये असणाऱ्या 7 सदस्यांपैकी रुचिताला घराबाहेर जाण्याचा आदेश देण्यात आला आणि प्रेक्षकांना मोठं धक्का बसला. गेल्या काही दिवसांपासून रुचिताचा गेम चांगलाच बिघडला होता. भाऊच्या धक्यावर अनेकदा रितेश भाऊंनी तिला तिच्या चुका दाखवून दिल्या पण तिचा गेम विशालभोवतीच फिरला. परिणामी तिला बिग बॉसच्या घरातून EXIT घ्यावी लागली. घरातून बाहेर पडल्यानंतर रुचीताने पोस्ट करत प्रेक्षकांची माफी मागितलीय. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
घराबाहेर येताच रुचीताची पोस्ट
ती म्हणाली, 'बिग बॉसच्या या घरात प्रत्येक गोष्ट मी मनापासून केली आणि खूप वेळा नॉमिनेट झाले तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी मला या खेळात लढायला बळ दिलं. मी घरात ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील त्या बद्दल तुमची मनापासून माफी मागते. आजचं एविक्शन माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे, पण जनतेचा निर्णय मला मनापासून मान्य आहे. माझ्या या प्रवासात माझी साथ दिल्या बद्दल खूप खूप आभार !''
View this post on Instagram
ज्या स्पर्धकाने गेम हलक्यात घेतला त्याच्यावर बिग बॉस आणि मी ॲक्शन घेणार असं म्हणत एका स्पर्धकाला आपल्या नावाची पाटी खाली उतरवून घरातून निघून जाण्यास रितेश भाऊ सांगतात. रितेश भाऊंचा आदेशावर रुचिता धायममोकलून रडताना दिसते. सागर, आयुषही रडताना दिसतात. सर्वच स्पर्धकांना मोठा धक्का बसल्याचे दिसतं.
बिग बॉसच्या घरात आल्यापासून रुचिता जामदार तिचे घरातील जवळपास प्रत्येकाशीच वादविवाद झाले आहेत. घरात आल्यापासून प्रत्येक टास्क आणि प्रत्येक ठिकाणी रुचिताचा आवाज वाढलेला दिसला. गेल्या आठ आठवड्यांमध्ये रितेश भाऊंनी अनेकदा रुचिताला आरसा दाखवल्याचे दिसलं . रुचिताच्या भांडणामुळे आणि एकूणच बोलण्याच्या पद्धतीमुळे अनेक जण तिच्यावर नाखुश होते.
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष






















