एक्स्प्लोर

विराजशी लग्न की समीरच होणार सोबती? ‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेत प्रेक्षकांना अनपेक्षित ट्विस्ट

एकीकडे अर्पिता आणि  विराज तर दुसरीकडे समीर आणि राजसी यांच्या लग्नाची लगबग सुरु आहे. अर्पिता व समीर यांनी घरच्यांच्या सुखासाठी मनाविरुद्ध लग्न कारण्यासाठी होकार दिला आहे.  

Sun Marathi Serial: सन मराठीवरील 'तू अनोळखी तरी सोबती' या मालिकेने कमी कालावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. मालिकेतील मुख्य पात्र समीर आणि अर्पिता यांच्या हळुवार फुलणाऱ्या मैत्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दोन अनोळखी लोक एकमेकांच्या आयुष्यात येणं आणि त्यांचा एकेमकांच्या सोबतीने होणार प्रवास रंजकतेने या मालिकेतून दाखवला जातोय. मात्र सध्या अर्पिता व समीरची मैत्री सगळ्यांनाच खटकत असल्यामुळे दोघेही एकमेकांशी बोलणं टाळूया असं ठरवतात. तर एकीकडे अर्पिता आणि  विराज तर दुसरीकडे समीर आणि राजसी यांच्या लग्नाची लगबग सुरु आहे. अर्पिता व समीर यांनी घरच्यांच्या सुखासाठी मनाविरुद्ध लग्न कारण्यासाठी होकार दिला आहे.  

रुखवताची तयारी, साड्यांचा बस्ता अन्..

नुकताच मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्यामध्ये लग्नाच्या तयारीची धामधूम दिसत आहे. रुखवताची तयारी, साड्यांचा बस्ता, पत्रिका अशा सगळ्या गोष्टींची लगबग सुरू असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. पण या लग्नामुळे अर्पिता खरंच आनंदी आहे का? नेहमीच घरच्यांचा विचार करणाऱ्या अर्पिताच्या नशिबात नक्की काय लिहिलं आहे? नियती अर्पितासाठी नेमकं काय ठरवणार? या सर्व प्रश्नांची उत्तर येत्या ८ मार्चला दुपारी १ व सायं. ७:३० वाजता  २ तासांच्या विशेष भागातून पाहायला मिळणार आहे.  

सेटवर आनंदाचे वातावरण 

मालिकेत अर्पिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री योगिता चव्हाण याबद्दल म्हणाली की, "मालिकेत खूप मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या अर्पिताचं लग्न पार पडणार आहे. स्वतःच सुख कशात आहे हे माहिती असूनही अर्पिता फक्त कुटुंबाचा विचार करते, त्यांचा आनंद पाहते. अश्या बऱ्याच मुली असतात ज्या स्वतःच्या मनाविरुद्ध कुटुंबाच्या सुखासाठी लग्नासाठी तयार होतात. पण आता अर्पितासाठी नियतीने काय ठरवलंय हे येत्या ८ मार्चला प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सध्या मालिकेच्या सेटवर प्रचंड आनंदच वातावरण, लगबग, लग्नाची तयारी सुरु आहे. त्यामुळे शूटिंग करताना आम्ही सगळे खूप धमाल करतोय. लग्नसोहळा मालिकेत दिसताना सुंदर वाटतो. पण त्या मागे खूप मेहनत असते. यासाठी मालिकेची टीम दिवसरात्र काम करत आहे.ही लग्नसराई संपूर्ण आठवडाभर सुरु असणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना अर्पिता म्हणून मी आग्रहाचं आमंत्रण देतेय. प्रेक्षकांशिवाय हे लग्न पार पडू शकत नाही."

 

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Embed widget