एक्स्प्लोर

घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका

दोन-तीन दिवस झाले काही माध्यमांनी चालवून दिलं की, पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार,  विनाकारण मोठ्या मोठ्या रांगा पेट्रोल पंपावर आपल्याला पाहायला मिळाल्या.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात, राज्यात गॅस (Gas) आणि इंधनाचा तुटवडा होत असल्यासंदर्भात भूमिका मांडली. यावेळी, घरगुती गॅस सिलेंडरच्या 60 रुपयांच्या दरवाढीसंदर्भातील प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिले. घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले आहेत. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, लोकांमध्ये चुकीची माहिती देऊन पॅनिक तयार करू नका, भारत सरकारने अतिशय स्पष्टपणे या संदर्भातली भूमिका मांडली आहे. भारताच्या एनर्जी सिक्युरिटीच्या संदर्भात कशाप्रकारे मोदीजींनी पाऊल उचलली आहेत हे आपल्यासमोर आलेलं आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 

अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक पातळीवर परिणाम होत असून, त्याचा फटका भारतालाही बसत आहे. सध्या देशात एलपीजी गॅसची (Gas) तुटवड्याची परिस्थिती जाणवत आहे, आणि याचा सर्वात मोठा परिणाम हॉटेल उद्योगावर झाला आहे. कमर्शियल एलपीजी गॅसचे दर अचानक 150 ते 200 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय पुढे कसा चालवायचा, हा प्रश्न व्यवसायिकांसमोर उभा राहिला आहे. दुसरीकडे घरगुती गॅसच्या दरातही 60 रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घराचे गणित बिघडले आहे. त्यातच, गॅस सप्लायही काही शहरांत बंद पडल्याचे पाहायला मिळते. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता, असा कुठलाही प्रकार नाही, माध्यमांनी लोकांना पॅनिक करू नये, भारत सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे, असे सांगितले. 

इंधनाची कुठलीही कमतरता नाही

दोन-तीन दिवस झाले काही माध्यमांनी चालवून दिलं की, पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार,  विनाकारण मोठ्या मोठ्या रांगा पेट्रोल पंपावर आपल्याला पाहायला मिळाल्या. भारत सरकारने सांगितलं की, अशी कुठलीही कमतरता होणार नाही. त्यामुळे भविष्यात जी परिस्थिती उद्भवेल याचा सामना करण्याकरता भारत सरकार मोदीजींच्या नेतृत्वात सक्षमपणे भक्कम परिस्थितीत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना सांगितले. 

गॅस दरवाढीमुळे महिलांच्या तक्रारी

पुण्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दरांमुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सिलेंडरचे दर सातत्याने वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. महिलांचे म्हणणे आहे की, गॅसचे दर वाढत आहेत, तेलाचे दर वाढत आहेत, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत. मात्र आमचे पगार काही वाढत नाहीत. गॅस एजन्सीकडे गेल्यानंतर अनेक वेळा वेळेवर गॅस मिळत नाही, अशी तक्रारही महिलांनी केली आहे.

हेही वाचा

कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण, कमवा आणि शिका योजनेतून 2000 रुपये मिळणार; चंद्रकांत पाटलांची घोषणा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Manoj Jarange Patil: डिफेंडर कारवरून डिवचलं, मनोज जरांगेंनी विरोधकांना चांगलच सुनावलं; म्हणाले, ‘यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का?’
डिफेंडर कारवरून डिवचलं, मनोज जरांगेंनी विरोधकांना चांगलच सुनावलं; म्हणाले, ‘यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का?’
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Embed widget