Alia Ranbir Wedding : रणबीरला सासूकडून मिळालं कोट्यवधींचे घड्याळ; आलियानं पाहुण्यांना दिली काश्मिरची शाल
आलियाच्या (Alia Bhatt) आईने म्हणजेच सोनी राजदान (Soni Razdan) यांनी रणबीरला (Ranbir Kapoor) दिलेल्या भेटवस्तूनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Alia Ranbir Wedding : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) यांनी 15 एप्रिल रोजी लग्नगाठ बांधली. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तसेच अगदी साध्या पद्धतीनं या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये आलिया आणि रणबीरला उपस्थित पाहुण्यांनी अनेक भेटवस्तू दिल्या. त्यामधील आलियाच्या आईने म्हणजेच सोनी राजदान (Soni Razdan) यांनी रणबीरला दिलेल्या भेटवस्तूनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
रिपोर्टनुसार, आलियाच्या आईनं रणबीरला 2.50 कोटी किंमत असणारे घड्याळ भेटवस्तू म्हणून दिले. आलेल्या पाहुण्यांना आलिया भटने काश्मिरी शॉल दिल्या. रिपोर्टनुसार, रणबीरचे शूज लपवणाऱ्या आलिच्या मैत्रिणी आणि बहिणींनी रणबीरला 11.5 कोटी मागितले. पण रणबीरनं त्यांना एक लाख रूपये दिले.
आलियाची खास पोस्ट
विवाह सोहळा पार पडल्यानंतर आलियानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. या पोस्टला आलियानं कॅप्शन दिलं,"कुटुंब आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत आम्ही लग्नबंधनात अडकलो आहोत. आमच्या आयुष्यातील या खास दिवशी तुम्ही केलेल्या प्रेमाच्या वर्षावासाठी आभार".
आलिया आणि रणबीरचा 'ब्रम्हास्त्र' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आलिया आणि रणबीर कपूर यांच्यासोबतच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच मौनी रॉय आणि नागार्जुन हे या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. 9 सप्टेंबर 2022 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हेही वाचा :
- TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Kitchen Kallakar : 'किचन कल्लाकार'मध्ये राजकीय मेजवानी; कॉंग्रेस, भाजप आणि मनसेचे 'हे' बडे नेते लावणार हजेरी
- Jayeshbhai Jordaar Poster : 'जयेशभाई जोरदार'चे पोस्टर रिलीज; रणवीरने विचारलं, जयेशभाईंना मुलगा होणार की मुलगी?
- Tiger Shroff : 33 सेकंद अन् 52 बॅकफ्लिप! चिमुकल्या सानवीला पाहून टायगर श्रॉफही झाला स्तब्ध!