TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
बॉक्स ऑफिसच नाहीतर IMDbवरही ‘केजीएफ 2’चा धुमाकूळ
रॉकिंग स्टार यशच्या ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या कथेपासून ते दमदार अॅक्शन सीक्वेन्स आणि रॉकी भाईचे दमदार संवाद चाहत्यांना खूप आवडत आहेत. एकीकडे KGF 2 (हिंदी) हा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला, तर दुसरीकडे या चित्रपटाने आता IMDb वरही आपली जादू दाखवली आहे. चित्रपटाला IMDb वर जबरदस्त रेटिंग मिळाले आहे. ‘केजीएफ 2’ला 9.7 रेटिंग मिळाले आहे.
'किचन कल्लाकार'मध्ये राजकीय मेजवानी
'किचन कल्लाकार' हा छोट्या पडद्यावरचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या किचनमध्ये चांगलाच कल्ला केला आहे. आता या कार्यक्रमात राजकीय धुरळादेखील पाहायला मिळणार आहे. किचन कल्लाकारच्या आगामी भागात कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड आणि मनसे नेते नितीन सरदेसाई दिसणार आहेत.
'जयेशभाई जोरदार'चे पोस्टर रिलीज
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या आगामी 'जयेशभाई जोरदार' हा सिनेमुळे चर्चेत आहे. 19 एप्रिलला या सिनेमाचा ट्रेलर आऊट होणार आहे. रणवीरने नुकतेच 'जयेशभाई जोरदार' सिनेमाचे नवीन पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
टीव्ही अभिनेत्री छवी मित्तलचा ब्रेस्ट कॅन्सरशी संघर्ष
टीव्ही शो आणि चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री छवी मित्तलने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर स्तनाच्या कर्करोगासोबतच्या तिच्या संघर्षाबद्दल खुलासा केला. आपण या आजाराचा सामना कसा केला हे शेअर करण्यासाठी अभिनेत्रीने एक भावनिक पोस्टदेखील लिहिली आहे.
हृता दुर्गुळे 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात
हृता दुर्गुळे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सध्या हृता 'मन उडू उडू झालं' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहचत आहे. हृताला फुलपाखरू मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. हृता 18 मे 2022 रोजी प्रतीक शाहसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
'द दिल्ली फाइल्स' सिनेमात नेमकं काय दाखवणार? विवेक अग्निहोत्रींनी केले स्पष्ट
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाईल्स' या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. अनेक राज्यांत हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. लवकरच हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. अशातच विवेक अग्निहोत्री यांनी 'द दिल्ली फाइल्स' या आगामी सिनेमाची घोषणा केली. दरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी 'द दिल्ली फाइल्स'वर भाष्य केले आहे.
यशच्या 'केजीएफ 2'चा बोलबाला; सहा विक्रम केले नावावर
यशचा 'केजीएफ 2' हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. अशातच या सिनेमाने आतापर्यंत सहा रेकॉर्ड केले आहेत. सध्या प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे.
आर माधवनच्या लेकाची उत्तुंग भरारी
‘3 इडियट्स’ चित्रपटानंतर अभिनेता माधवनला लोकांचे खूप प्रेम मिळाले. या चित्रपटानंतर तो इंडस्ट्रीचा फेव्हरेट बनला. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ अभिनेताच नाही, तर त्याच्या मुलाचीही सध्या खूप चर्चा होते आणि तीही अभिनयामुळे नाही तर त्याच्या खेळामुळे... माधवनचा मुलगा वेदांत माधवन अतिशय उत्तम जलतरणपटू म्हणून उदयास येत आहे. कोपनहेगन येथे झालेल्या डेन्मार्क ओपनमध्ये पुन्हा एकदा देशाचे नाव उंचावले आहे. या स्पर्धेत त्याने रौप्य पदक पटकावले आहे. वेदांतने 10 जलतरणपटूंच्या अंतिम फेरीत 15.57.86 सेकंद वेळेसह दुसरे स्थान पटकावले.
'इंडियन आयडल मराठी'च्या महाअंतिम सोहळ्यात 'चंद्रमुखी' सिनेमातील 'बाई गं' गाणं होणार लॉंच
'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सध्या 'इंडियन आयडल मराठी'च्या महाअंतिम सोहळ्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान अमृता खानविलकर सुरांच्या मंचावर चंद्रमुखी सिनेमातील 'बाई गं' हे गाणं पहिल्यांदाच सादर करणार आहे.
Aai Kuthe Kay Karte : ‘लाज वाटते तुला बायको म्हणण्याची’, पोलिसांच्या तावडीतून सोडवण्याऐवजी अनिरुद्धच संजनावर बरसला!
मालिकाविश्वात सध्या ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांच्या यादीत अग्रक्रमावर आहे. या मालिकेत दररोज येणारी नवी वळणं प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवत आहेत. ‘अरुंधती’पासून ते ‘आशुतोष’पर्यंत सगळीच पात्र प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. सध्या या मालिकेत कुटुंब आणि नात्यांमधील ओढाताण असा ट्रॅक सुरु आहे. आता लवकरच पोलीस संजनाला अटक करणार आहेत.