एक्स्प्लोर

सेक्रेड गेम्समधील गणेश गायतोंडेची बायको आठवतेय? मराठी अभिनेत्री जीवघेण्या आजाराशी झुंजतेय, हृदयद्रावक पोस्ट

instagram वर राजश्रीने रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिने एनफिल्ट्रेटींग ड्युकटल कॅर्सीनोमा म्हणजेच ग्रेड 1 प्रकारचा स्तनाचा कर्करोग असल्याचं नमूद केलं. 

Rajashree Deshpande: मोठ्या पडद्यासह ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांना थक्क करणारी अभिनेत्री राजश्री देशपांडे (Rajashree Deshpande) सध्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे. सेक्रेड गेम्स, ट्रायल बाय फायर यासारख्या गाजलेल्या वेब सिरीजमधून दमदार भूमिकांसाठी ओळखली जाणारी मराठी अभिनेत्री राजश्री देशपांडे सध्या स्तनाच्या  कर्करोगाचे निदान झाले आहे. सोशल मीडियावर तिने बुधवारी एक भावनिक पोस्ट शेअर करत तिला स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती दिली. तिच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. अनेक कलाकार तिला लवकर बरी हो असं म्हणत कमेंट करत आहेत.  

राजश्रीला स्तनाचं कर्करोग असल्याचं निदान झाल्यानंतर तिच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया झाली आहे. तिने instagram वर नुकतीच हेल्थ अपडेट शेअर केली असून तिच्या अनेक सहकाऱ्यांनी कमेंट करत तिच्या जिद्दीचा कौतुक केलंय. ही पोस्ट शेअर करताना माझ्या आई-वडिलांना हे सत्य सांगण्याचा धाडस माझ्यात आलंय असं म्हणत ही बातमी शेअर केली. सध्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर ती बरी होत असल्याचं तिनं या पोस्टमध्ये सांगितलं आहे. instagram वर राजश्रीने रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिने एनफिल्ट्रेटींग ड्युकटल कॅर्सीनोमा म्हणजेच ग्रेड 1 प्रकारचा स्तनाचा कर्करोग असल्याचं नमूद केलं. 

काय म्हणाली मराठमोळी अभिनेत्री? 

राजश्रीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं," तुम्ही हे वाचत आहात, याचा अर्थ मी अखेर माझ्या आई-वडिलांना सांगण्याचं धैर्य एकवटलं आहे की मला Infiltrating Ductal Carcinoma (NOS) – ग्रेड 1 स्तनाचा कर्करोग असल्याचं निदान झालं आहे. आता तुम्हा सगळ्यांनाही हे सांगण्याची वेळ आली आहे. सुदैवाने, नियमित तपासणीदरम्यान हा आजार अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आढळला आणि त्यामुळे आम्हाला लढण्याची संधी मिळाली. असंख्य तपासण्या, शस्त्रक्रिया  हा सगळा प्रवास एखाद्या रोलरकोस्टरसारखा होता. पण विश्वास ठेवा, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि आपुलकीने मला यातून ताकद दिली. शस्त्रक्रियेनंतर आई आणि पप्पांच्या चेहऱ्यावरचा दिलासा पाहिला आणि माझी भीती वितळून अटळ शक्तीत बदलली. सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे आता मला जग जिंकण्याची तयारी असल्यासारखं वाटतंय.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajshri (@rajshri_deshpande)

आता मी हळूहळू पूर्णपणे बरी होत आहे आणि लवकरच रुग्णालयातून घरी परतणार आहे. डॉ. मंदार नाडकर्णी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार. त्यांच्या कौशल्यपूर्ण उपचारांमुळे आणि काळजीमुळे हा प्रवास अधिक सौम्य झाला.तुमचं प्रेम हीच माझी खरी औषधं आहेत. आता पुढे आहे उपचार, आशा आणि अधिक उजळ दिवसांची सुरुवात. 2026 ची सुरुवात मी खूप उत्साहाने केली होती. ग्रामीण भागात आणखी दोन शाळा सुरू करण्याचं नियोजन, एका नदीच्या प्रवाहाचं पुनरुज्जीवन आणि काही अप्रतिम कथा शूट करण्याचं स्वप्न. मी पूर्ण ऊर्जेने आणि उद्देशाने भारलेली होते. आणि काहीच बदलणार नाही. हे सगळं होणारच, कदाचित आणखी सुंदर पद्धतीने.

मी या नव्या प्रवासात श्रद्धा, धैर्य आणि प्रेमाने भरलेल्या हृदयासह पाऊल टाकते आहे. हा माझ्या आयुष्यातला एक अध्याय आहे, संपूर्ण कहाणी नाही. आता एक कर्करोग योद्धा, सामाजिक कार्यकर्ती आणि एक माणूस म्हणून माझी ऊर्जा, करुणा आणि जिद्द अधिक दृढ झाली आहे. विशेषतः स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अजून खूप काम करायचं आहे.म्हणूनच मनापासून हे तुमच्याशी शेअर करत आहे. तुमच्या प्रार्थनांमध्ये मला आठवा, जेणेकरून मी पुन्हा उंच भरारी घेऊ शकेन आणि दिलेली प्रत्येक वचनं पूर्ण करू शकेन.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajshri (@rajshri_deshpande)


हा पोस्ट माझ्या मोठ्या, तेजस्वी स्मितासह शेअर करते आहे. कारण माझं हास्य अजूनही तितकंच उजळ आहे आणि माझी जिद्द त्याहून अधिक प्रकाशमान आहे. तुमचे सगळे संदेश, व्हॉइस नोट्स मी वाचते आहे, ऐकते आहे आणि शक्य तितक्या सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करते आहे. तुमच्यावर मनापासून आणि अखंड प्रेम.

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget