Shahrukh Khan : शाहरुख खानने इजिप्तच्या चाहत्याचे मानले आभार, नेमकं काय आहे कारण?
Shahrukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने त्याच्या इजिप्तमधील चाहत्याचे आभार मानले आहेत.
Shahrukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे (Shahrukh Khan) चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुख सिनेमासृष्टीपासून दूर होता. पण आर्यन खान प्रकरणामुळे तो सोशल मीडियावर चर्चेत होता. 2021 च्या अखेरीस एका महिला प्राध्यापकाने ट्वीट करत शाहरुख खानमुळे तिला कशी मदत झाली हे सांगितले होते.
अशोका विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका अश्विनी देशपांडे यांनी ट्वीट केले, इजिप्तमधील एक ट्रॅव्हल एजंटला पैसे ट्रान्सफर करायचे होते. पण ट्रान्सफर करण्यासाठी अनेक समस्या येत होत्या. तेव्हा तो एजंट म्हणाला,"तू शाहरुख खानच्या देशातील आहेस. माझा तुझ्यावर विश्वास आहे. मी तुझे बुकिंग घेतो. तू मला नंतर पैसे दे. मी सहसा असे काही करत नाही पण शाहरुखने आमच्यासाठी जे काही केले आहे. त्यामुळे शाहरुखसाठी काहीही".
Needed to transfer money to a travel agent in Egypt. Was having problems with the transfer. He said: you are from the country of @iamsrk. I trust you. I will make the booking, you pay me later. For anywhere else, I wouldn't do this. But anything for @iamsrk. & he did!#SRK is 👑
— Ashwini_Deshpande (@AshwDeshpande) December 31, 2021
शाहरुखने ट्रॅव्हल एजंटची इच्छा केली पूर्ण
शाहरुखचे चाहते जगभर आहेत. अशातच शाहरुखने अश्निनी यांना एक ऑटोग्राफ फोटो आणि पत्र पाठवले आहे. त्यामुळे अश्विनी ट्वीट करत म्हणाल्या,"माझ्या प्रकरणाचा शेवट आनंददायी झाला आहे.शाहरुखने साइन केलेले 3 फोटो आज आले. एक इजिप्तच्या ट्रॅव्हल एजंटसाठी, एक त्याच्या मुलीसाठी आणि एक माझ्यासाठी".
A very happy ending to this story. 3 photos signed by SRK arrived today, one with the nicest message for the Egyptian travel agent, one for his daughter & one for mine @Ketaki_Varma 🥰🥰 Thanks @pooja_dadlani for getting in touch & of course to 👑 @iamsrk for the gracious gesture https://t.co/lYd431dBUq pic.twitter.com/Rhn1ocQlbo
— Ashwini_Deshpande (@AshwDeshpande) January 22, 2022
शाहरुखचे आगामी प्रोजेक्ट
शाहरूखचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पठाण चित्रपटात शाहरूखसोबत सलमान खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम हे कलाकार देखील दिसणार आहेत. शाहरूखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
संबंधित बातम्या
ROHILEEचा लग्नसोहळा थाटामाटात पडला पार, पुण्याच्या ढेपेवाढ्यात बांधली लग्नगाठ!
Katrina Kaif Education : घडाघडा इंग्रजी बोलणारी कतरिना कैफ कधीच शाळेत जाऊ शकली नाही! नेमकं कारण काय?
Lata Mangeshkar Health Update : प्रकृतीविषयी तर्क-वितर्क, लता मंगेशकरांनी ट्वीट करत चर्चेला दिला पूर्णविराम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha