एक्स्प्लोर

Priya Bapat : मुन्नाभाईनंतर हिंदी सिनेमा करायला एवढा वेळ का लागला? प्रिया बापट कारण सांगत म्हणाली...

Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापट हिचा विस्फोट हा सिनेमा नुकताच जिओ सिनेमावर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Priya Bapat : 'मुन्नाभाई' या सिनेमातून अभिनेत्री प्रिया बापटने (Priya Bapat) बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. पण त्यानंतर तिने बॉलिवूडपेक्षा मराठी सिनेमा, नाटकं, मालिका यामधून प्रेक्षकांचं जास्त मनोरंजन केल्याचं पाहायला मिळालं. मराठीतल्या तिच्या प्रत्येक भूमिकेचं प्रेक्षकांकडूनही भरभरुन कौतुक झालं. मुन्नाभाईनंतर प्रिया कोणत्याही बॉलिवूड सिनेमात झळकली नव्हती. पण नुकताच तिचा विस्फोट हा बॉलिवूड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

दरम्यान मुन्नाभाईनंतर बॉलिवूडमध्ये काम करायलं एवढी वर्ष का लागली असा प्रश्न सध्या प्रियाला वारंवार विचारण्यात येतोय. यावर प्रियानेच एक सोशल मीडिया पोस्ट करत या प्रश्नांची उत्तरं दिली आहे. तसेच तिच्या या भूमिकेविषयीही प्रियाने भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे रितेश देशमुखसोबत प्रिया या सिनेमात दिसली आहे. त्यामुळे एका मराठीमोळ्या जोडीचा हा बॉलिवूड सिनेमा आहे. 

प्रियाची पोस्ट नेमकी काय?

प्रियाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं की,  ही विस्फोटमधली तारा, माझा पहिला हिंदी सिनेमा. मुन्नाभाईनंतर तुला हिंदी सिनेमांकडे पुन्हा वळायला एवढा वेळ का लागला असा प्रश्न मला प्रत्येकाने विचारला. खरंतर मी हे कधीच प्लॅन केलं नव्हतं. माझ्या प्रवासाने मला इथवर आणून सोडलं आहे आणि जेव्हा संधी मिळाली ती मी सोडली नाही. 

'हे एक नवं पाऊल...'

तुमच्यातल्या अनेकांना तारा आवडली, तर काहींनी तिने तिच्या नवऱ्याला फसवलं म्हणून तिचा रागही केला. कोणतंही जजमेंट न करता तिची भावनिक स्थिती समजून घेणं, हा प्रवास फार रंजक होता. ताराची भूमिका करण्याचं आणखी एक मुख्य कारणं म्हणजे  तिला तिची मतं आहेत, ती बिनधास्त आहे आणि तिला तिची खरी परिस्थिती माहितीये. बरोबर किंवा अयोग्य हे नेहमीच व्यक्तिनिष्ठ असतं. पण स्वतःचा आनंद शोधणारी स्त्री साकारणं हे पितृसत्ताकतेमधलं एक नवं पाऊल आहे. 

'ही भूमिका एक आव्हान...'

ही भूमिका साकारणं एक आव्हान होतं आणि एक अभिनेत्री एखाद्या भूमिकेमध्ये आव्हानांशिवाय आणखी काय मागू शकते? रितेश देशमुख सर फक्त एक उत्तम अभिनेताच नाही तर चांगला सह कलाकार म्हणूनही तुम्हाला खूप खूप थ्यँक्यू. तुमच्यासोबतचा प्रत्येक सीन हा तुमच्या उत्तम अभिनयामुळे शक्य झाला.  

View this post on Instagram
 
A post shared by Priya Bapat (@priyabapat)

ही बातमी वाचा : 

Deepika Padukone : मुलीसाठी नॅनी नाही ठेवणार दीपिका पादुकोण? 'या' अभिनेत्रींसारखं करणार पॅरेंटिंग?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'हे आहेत नेते अन् ही आहे आपली लायकी .. '; भाजप नेत्यावर आस्ताद काळेचा संताप, पोस्ट करत म्हणाला..
'हे आहेत नेते अन् ही आहे आपली लायकी .. '; भाजप नेत्यावर आस्ताद काळेचा संताप, पोस्ट करत म्हणाला..
सांगलीची राजकन्या साकारणार रितेश देशमुखच्या बहुचर्चित 'राजा शिवाजी’ चित्रपटात दमदार भूमिका
सांगलीची राजकन्या साकारणार रितेश देशमुखच्या बहुचर्चित 'राजा शिवाजी’ चित्रपटात दमदार भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईची कॅन्सर आजारावर मात; माऊलीच्या लढाईवर वाढदिनी लेक भावुक, म्हणाली..
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईची कॅन्सर आजारावर मात; माऊलीच्या लढाईवर वाढदिनी लेक भावुक, म्हणाली..
'ती मला काहीतरी सांगणार होती...' प्राजक्ताबाबत करण सोनावणेकडून खंत व्यक्त; भाऊच्या धक्क्याआधी नेमका काय प्लॅन झाला?
'ती मला काहीतरी सांगणार होती...' प्राजक्ताबाबत करण सोनावणेकडून खंत व्यक्त; भाऊच्या धक्क्याआधी नेमका काय प्लॅन झाला?

व्हिडीओ

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी
Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान
Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
Vijay Mallya : विजय मल्ल्यानं इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं, भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही म्हणाला, कोर्टात नवा कांगावा
भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही, विजय मल्ल्याचा नवा कांगावा, इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
रुग्णांच्या जीवाशी खेळ, ह्रदयविकाराची शक्यता; बीपीच्या बनावट गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
रुग्णांच्या जीवाशी खेळ, ह्रदयविकाराची शक्यता; बीपीच्या बनावट गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
Ishan Kishan: मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
Embed widget