एक्स्प्लोर

Apali Dosti Ek Number : मैत्रीच्या नात्याची सुंदर संकल्पना, 'आपली दोस्ती एक नंबर' गाणं अवघ्या काही तासांतच तुफान व्हायरल!

Apali Dosti Ek Number : या गाण्याने सोशल मीडियावर तुफान प्रसिद्धी मिळवली आहे. मैत्रीचे कोमल भावबंध उलगडणारं हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.

Apali Dosti Ek Number : हिंदी, पंजाबी प्रमाणेच मराठी संगीत क्षेत्रातही नवनवीन गाणी प्रदर्शित होऊन व्हायरल होताना दिसतात. आत्तापर्यंत ‘दिलाची चोरी’, ‘कारभारी’, ‘रिमझिम’, ‘माझं हृदय’ अशी जवळपास 12 मराठी गाण्यांची निर्मिती करणारा निर्माता मनोज सांगळे 'आपली दोस्ती एक नंबर' (Apali Dosti Ek Number)  हे गाणं मैत्रीदिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे. हे गाणं नुकतचं 'एम एस प्रॉडक्शन'वर प्रदर्शित झालं आहे‌. या गाण्याने सोशल मीडियावर तुफान प्रसिद्धी मिळवली आहे. मैत्रीचे कोमल भावबंध उलगडणारं हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.

एम. एस. प्रॉडक्शन आणि डि जी. फिल्म प्रॉडक्शन यांनी या गाण्यात एकत्र काम केले आहे. काही क्षणातच या गाण्याला सोशल मीडियावर प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

पाहा गाणे :

या गाण्याविषयी बोलताना निर्माते मनोज सांगळे सांगतात की, ‘हे गाणं म्हणजे माझ्यासाठी ड्रिम प्रोजेक्ट आहे. कॉलेजमध्ये असताना मी ठरवलं होतं की, मैत्री हा विषय घेऊन एक सुंदर गाणं करायचं. मैत्री हे एक‌ असं नातं आहे जे रक्ताच्या ही पलिकडे असतं. मैत्री करताना आपण काहीच नाही बघतं, तसंच जात पात देखील पाहत नाही. हेच या गाण्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे गाणं मी एम एस प्रॉडक्शनच्या संपूर्ण टीम‌ला आणि माझा खास मित्र अविनाश सोनावणे यांना समर्पित करतो.’

‘आपली दोस्ती एक नंबर' या गाण्याचे गीतकार प्रशांत तिडके आहेत, तर संगीतकार सौरभ मस्तोलीने या गाण्याचे संगीत केले आहे. गायक ऋषिकेश शेलार आणि गायिका स्नेहा महाडिक हीने हे गाणं गाऊन या गाण्याला चार चांद लावले आहेत. या गाण्यात ऋषिकेश तिकोणे, जगदीश निकम, मिकी झेहेन, मनोज सांगळे, तनू भोसले, शिवानी कांबळे, आरती थोरवे, साहिल दराडे, ऋतुजा मुसळे आणि शरद जोपले हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र 'आपली दोस्ती एक नंबर' या गाण्याची चर्चा आहे.

हेही वाचा :

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Saurabh Ghadge : आम्ही इन्फ्ल्युन्सर नाही तर कॉन्टेंट क्रिएटर : सौरभ घाडगे

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna: 'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
Zee Marathi Award Show: झी मराठी अवॉर्ड्समध्ये 7 आईंची धमाल! परफॉर्मेन्स जबरदस्त अन् मनोरंजनाचा फूल्ल तडका, दिमाखदार रंगला पुरस्कार सोहळा
झी मराठी अवॉर्ड्समध्ये 7 आईंची धमाल! परफॉर्मेन्स जबरदस्त अन् मनोरंजनाचा फूल्ल तडका, दिमाखदार रंगला पुरस्कार सोहळा
Sankarshan Karhade Grandmother: 'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
Sana Makbul HomeWrecker: 'होमब्रेकर...' माही विज अन् जय भानुशालीचा सुखी संसार मोडल्याचा TV अभिनेत्रीवर आरोप; नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर
'होमब्रेकर...' माही विज अन् जय भानुशालीचा सुखी संसार मोडल्याचा TV अभिनेत्रीवर आरोप; नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

व्हिडीओ

Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Manoj Jarange : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
मरण आलं तरी चालेल पण हा लढा थांबता कामा नये; वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना सवाल
मरण आलं तरी चालेल पण हा लढा थांबता कामा नये; वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना सवाल
Embed widget