Saurabh Ghadge : आम्ही इन्फ्ल्युन्सर नाही तर कॉन्टेंट क्रिएटर : सौरभ घाडगे
Friendship Day : आम्हाला इन्फ्ल्युन्सर समजलं जातं. पण इन्फ्ल्युन्सर आणि कॉन्टेंट क्रिएटरमध्ये फरक आहे, असे काही कॉन्टेंट क्रिएटर मंडळींचे मत आहे.
Friendship Day 2022 : आम्ही फक्त कॉन्टेंट क्रिएटर आहोत. त्यामुळे आम्ही फक्त लोकांना हसवण्याचं काम करतो. सल्ले देण्याचं काम आम्ही करत नाही. प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे आमचं काम आहे. आम्हाला इन्फ्ल्युन्सर समजलं जातं. पण इन्फ्ल्युन्सर आणि कॉन्टेंट क्रिएटरमध्ये फरक आहे. असे मत 'फ्रेंडशिप डे' (Friendship Day) निमित्त एबीपीला दिलेल्या एका मुलाखतीत कॉन्टेंट क्रिएटर सौरभ घाडगेने मांडले आहे.
आजच्या या युगातील एक ट्रेंड म्हणून असणारा विषय म्हणजे डेज (Days). त्याच डेड मधला एक डे म्हणजे फ्रेंडशिप डे (Friendship Day). ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. चांगल्या वाईट अनुभवातून मैत्री प्रत्येकाच्या जगण्यातले अर्थ बदलत असते. आपल्या आयुष्यात कुणीही Add किंवा Delete झालं तरी मैत्रीची जागा कुणी मनातून हिरावून घेऊ शकत नाही. मैत्रीसाठी प्रत्येकाला कधी-कधी घरातून आरडा ओरडा ऐकू येतो तर कधी मैत्रीच्या नावाने कौतुक ही होत असतं. ऑरेंज ज्यूस ग्रुप याचे चांगले उदाहरण आहे.
View this post on Instagram
प्रेम जसं ठरवून होत नसतं अगदी तसंच मैत्री ही ठरवून होत नसते. असेच काही न ठरवून झालेले मित्र म्हणजे करण सोनावणे (Karan Sonawane), सौरभ घाडगे (Saurabh Ghadge), नील सालेकर (Neel Salekar), शुभम जाधव (Shubham Jadhav), श्रवण क्षीरसागर (Shravan Kshirsagar), सिद्धांत सरफरे (Sidhant Sarfare) आणि संतोष मिश्रा (Santosh Mishra). यांचा ऑरेंज ज्यूस ग्रुप सध्या खूप धमाल करताना आपल्याला दिसत असतो.
नील सालेकरचं 'जिंकलो' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
ऑरेंज ज्यूस ग्रुप मधील मंडळी असेच एक दिवस इन्स्टाग्रामवरील रिल्स करण्यासाठी भेटले आणि यांची गट्टी जमली. या गट्टीतून त्यांनी सोबत काम करायला सुरुवात केली. अनेक मोठ-मोठ्या कलाकारांसोबत हे कॉन्टेन्ट क्रिएटर काम करत असतात. नुकतचं या टीममधील नील सालेकरचं एक गाणंही रिलीज झालं आहे. नील सालेकर उर्फ जस्ट नील थिंग्सने गली गँगच्या डी'इव्हिल आणि कांचनसोबत 'जिंकलो' हे गाणं रिलीज केले आहे.
संबंधित बातम्या