Identity Box Office Collection Day 1: बॉक्स ऑफिस गाजवतोय 2025 मधला साऊथचा पहिला चित्रपट; पुष्पा अन् मार्कोला पछाडणार?
Identity Box Office Collection Day 1: पुष्पा 2 आणि मार्को ब्लॉकबस्टर मूव्हीजच्या कलेक्शनच्या वादळात 2025 च्या पहिल्या चित्रपटाची एन्ट्री. 2 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं पहिल्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला?
Identity Box Office Collection Day 1: 'पुष्पा 2 द रुल' (Pushpa 2 The Rule), 'मार्को' (Marco), 'बेबी जॉन' (Baby Jhon) आणि 'मॅक्स' हे चित्रपट आधीपासूनच चर्चेत असताना 2 डिसेंबरला साऊथचा 2025 या नव्या वर्षातला पहिला चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. मल्याळम इंडस्ट्रीनं आपली नव्या वर्षाची सुरुवात टोविनो थॉमस आणि त्रिषा कृष्णन अभिनीत थ्रिलर फिल्म 'आयडेंटिटी'नं (Identity) केली आहे. यामध्ये विनय राय, अजू वर्गीस, अर्चना कवी आणि शम्मी थिलकन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाला सोशल मीडिया यूजर्स आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. तर आयडेंटिटीनं रिलीजच्या पहिल्याच दिवशी चांगली सुरुवात केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटानं केरळमध्ये 1.50 कोटींची ओपनिंग केली आहे. तर चित्रपटाचं बजेट 50 ते 60 कोटी रुपये आहे.
बॉक्स ऑफिस ट्रॅकर Sacanilc नं दिलेल्या आकडेवारीनुसार, चित्रपटानं ओपनिंग डेच्या दिवशी 1.8 कोटींची कमाई केली आहे, ज्यापैकी मल्याळममध्ये 1.65 कोटींची कमाई केली आहे. तमिळमध्ये कमाई 15 लाख रुपयांची कमाई केली आहे. आयडेंटीटीच्या वर्ल्डवाईल्ड कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, चित्रपटाचं कलेक्शन 2 कोटींवर पोहोचलं आहे.
View this post on Instagram
'मार्को'मुळे 'आयडेंटिटी'च्या अडचणी वाढणार?
अखिल पॉल आणि अनस खान लिखित आणि दिग्दर्शित, आयडेंटिटी समोर उन्नी मुकुंदन याच्या मार्कोमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अॅक्शन, थ्रीलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. आणि अपेक्षा आहे की, हा चित्रपट 100 कोटींच्या आसपास लाईफटाईम कलेक्शन करेल. तर, फिल्मचं बजेट 30 कोटींपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, मार्कोच्या 14 दिवसांच्या कमाईबाबत बोलायचं तर, 43.9 कोटींची कमाई भारतात केली आहे. ज्यामध्ये मल्याळम भाषेत 37.37 कोटी, हिंदीमध्ये 4.93 कोटी आणि तेलगुमध्ये 1.6 कोटींची कमाई केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :