एक्स्प्लोर

Highest Grossing Film On New Year: नव्या वर्षात 'या' फिल्मनं 8 अब्ज कमावले, बॉक्स ऑफिसचं रेकॉर्ड मीटर चक्काचूर; कमाईत 'पुष्पा 2' आसपासही नाही, तुम्ही पाहिलाय?

Highest Grossing Film On New Year: नव्या वर्षाच्या विकेंडला तसे फारसे चित्रपट प्रदर्शित केले जात नाही. पण, या चित्रपटानं एक नवा विक्रम रचत न्यू ईयरच्या दिवशी बक्कळ गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट पुष्पा 2 नाही.

Highest Grossing Film On New Year: नवं वर्ष (New Year) म्हणजे, 1 जानेवारी हा सुट्टीचा दिवस असू शकतो, पण याच न्यू ईयरचा चित्रपट उद्योग चांगलाच फायदा घेतो. ख्रिसमस (जगभरात) आणि संक्रांतीला (दक्षिण भारतात) चित्रपटगृहांमध्ये मोठमोठे चित्रपट प्रदर्शित होतात, पण नव्या वर्षाच्या शनिवारी आणि रविवारी फार कमी चित्रपट प्रदर्शित होत असतात. तरीही, सुट्ट्यांमध्ये लाखो डॉलर्सची कमाई करणारे अनेक चित्रपट आहेत, त्यापैकी बहुतेक डिसेंबरमध्ये रिलीज झालेले आहेत. यातील सर्वात मोठ्या चित्रपटानं असा विक्रम रचलाय, जो कुणीच लवकरच मोडण्याची शक्यता नाही. हा हो... हा चित्रपट 'पुष्पा 2' (Pushpa 2 The Rule) नाही बरं का... मग कोणता चित्रपट आहे, पाहुयात सविस्तर... 

2015 मध्ये, 'स्टार वॉर्स' (Star Wars) सिक्वेल ट्रायोलॉजीच्या रूपात थिएटरमध्ये परतला. नव्या चित्रपटांपैकी पहिला 'द फोर्स अवेकन्स' (Star Wars: The Force Awakens) हा 18 डिसेंबर 2015 रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. पहिल्या वीकेंडमध्ये तब्बल अर्धा अब्ज डॉलर्सची कमाई करून, Star Wars Episode VII नं रेकॉर्ड बुक अपडेट करण्यास भाग पाडलं. विशेष बाब म्हणजे, दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यातही Star Wars Episode VII ची गाडी काही थांबण्याचं नाव घेत नव्हती. 

द फोर्स अवेकन्स'चं नव्या वर्षातील कलेक्शन

31 डिसेंबर 2015 रोजी या चित्रपटानं जगभरात 39 दशलक्ष डॉलर्स (म्हणजे 33,40,59,570 रुपये) कमावले. त्यानंतर, नव्या वर्षाच्या दिवशी, उत्तर अमेरिकेत 35 दशलक्ष डॉलर (2,99,79,70,500 रुपये) आणि परदेशात 26 दशलक्ष डॉलर्स (22,27,06,380 रुपये) कमाई करत मोठी झेप घेतली. 'स्टार वॉर्स: द फोर्स अवेकन्स' नं नव्या वर्षात 100 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच, 8,56,56,30,000 रुपये कमवून सर्वांचा विक्रम मोडला. तुम्ही आता हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड 'टाइटॅनिक'च्या नावे

गेल्या कित्येक वर्षांपासून 'न्यू ईयर डे कलेक्शन'चा रेकॉर्ड जेम्स कॅमरून (James Cameron) यांच्या 'टाइटॅनिक'च्या नावावर होता. 'टाइटॅनिक'नं 1998 मध्ये 1 जानेवारी रोजी उत्तर अमेरिकेत 11.5 मिलियन डॉलर्सची कमाई केली होती. दरम्यान, कॅमरुन यांचा हा विक्रम 2004 मध्ये 'द लॉर्ड ऑफ द रिंग्स: द रिटर्न ऑफ द किंग'नं हिसकावला. त्यावेळी या फिल्मनं तब्बल 12 मिलियन डॉलर्सची कमाई केली होती. 

'द फोर्स अवेकेंस' नं 'अवतार'चे रेकॉर्ड मोडले 

पण 1 जानेवारी 2010 रोजी 'अवतार' नं 25 दशलक्ष डॉलर्सच्या कलेक्शनसह 'द लॉर्ड ऑफ द रिंग्स: द रिटर्न ऑफ द किंग'चा  विक्रम मोडला. दरम्यान, सर्वाधिक कमाई करून, 'द फोर्स अवेकन्स' नं 2016 मध्ये 35 दशलक्ष डॉलर्ससह एक नवा विक्रम प्रस्थापित केला, जो आजही कायम आहे. अखेरीस, 'स्टार वॉर्स: द फोर्स अवेकन्स' नं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 2 अब्ज डॉलर्स म्हणजेच, 171,155,794,000 रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. 1 जानेवारी 2025 पर्यंत, हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट ठरला.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

बिग बींसोबत, जया बच्चन रागारागात एअरपोर्टवर, बोट करुन स्टाफवर खेकसल्या अन् तशाच निघून गेल्या; नेटकरी म्हणतायत, "खडूस बुढिया"

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आयुष्यभर माझं नाव घ्या मला काहीच फरक पडत नाही, मोहोळांचा शेट्टींसह धंगेकरांवर हल्लाबोल, म्हणाले घोषणाबाजी करणारे लोक कोणीतरी सोडलेले 
आयुष्यभर माझं नाव घ्या मला काहीच फरक पडत नाही, मोहोळांचा शेट्टींसह धंगेकरांवर हल्लाबोल, म्हणाले घोषणाबाजी करणारे लोक कोणीतरी सोडलेले 
जैन समुदायाचा मुरलीधर मोहोळ यांना घेराव, प्रश्नांचा भडीमार, जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी 
जैन समुदायाचा मुरलीधर मोहोळ यांना घेराव, प्रश्नांचा भडीमार, जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Satara Doctor Case: 'तू बीडची म्हणून सर्टिफिकेट देत नाहीस', महिला डॉक्टरवर कोणत्या खासदाराने दबाव टाकला?
Phaltan Doctor Case: 'PSI बदनेवर बलात्काराचा आरोप, निंबाळकरांनी धमकावलं का?'; प्रकरण तापलं
Satara Doctor Case : 'दोषींवर कठोर कारवाई होणार, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
Satara Doctor Case : 'पुरावा मिळाला तर सोडणार नाही', महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी फडणवीसांचा इशारा
Satara Doctor Case : '...राजकारण केलं जातंय', महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी रणजित Nimbalkar यांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आयुष्यभर माझं नाव घ्या मला काहीच फरक पडत नाही, मोहोळांचा शेट्टींसह धंगेकरांवर हल्लाबोल, म्हणाले घोषणाबाजी करणारे लोक कोणीतरी सोडलेले 
आयुष्यभर माझं नाव घ्या मला काहीच फरक पडत नाही, मोहोळांचा शेट्टींसह धंगेकरांवर हल्लाबोल, म्हणाले घोषणाबाजी करणारे लोक कोणीतरी सोडलेले 
जैन समुदायाचा मुरलीधर मोहोळ यांना घेराव, प्रश्नांचा भडीमार, जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी 
जैन समुदायाचा मुरलीधर मोहोळ यांना घेराव, प्रश्नांचा भडीमार, जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
GST Registration : 1 नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार, फक्त 3 दिवसात मंजुरी मिळणार, निर्मला सीतारामन यांची माहिती
1 नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार, फक्त 3 दिवसात मंजुरी मिळणार
Phaltan Crime : फलटण डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी नवी अपडेट, संशयित आरोपी प्रशांत बनकरची पोलीस कोठडीत रवानगी 
फलटण डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी नवी अपडेट, संशयित आरोपी प्रशांत बनकरची पोलीस कोठडीत रवानगी 
Actor Satish Shah Passed Away: बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
Shivsena : मुंबईत समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही, एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असतानाच मोठी अपडेट
मोठी बातमी, महायुतीत समसमान जागा वाटप व्हावं, मुंबईत समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही
Embed widget