KGF Chapter 2 : यश, संजय दत्त आन् रवीना टंडन; 'केजीएफ 2' च्या स्टार्सनं चित्रपटासाठी घेतले 'एवढे' मानधन
केजीएफ चॅप्टर 2 चित्रपटामध्ये यश (Yash), संजय दत्त (Sanjay Dutt), मालविका अविनाश (Malavika Avinash),श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty)आणि रवीना टंडन (Raveena Tandon) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
KGF Chapter 2 : 'केजीएफ चॅप्टर 2' (KGF Chapter 2) चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमधील डायलॉग्स आणि अॅक्शनला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटामध्ये यश (Yash), संजय दत्त (Sanjay Dutt), मालविका अविनाश (Malavika Avinash),श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty)आणि रवीना टंडन (Raveena Tandon) या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. जाणून घेऊयात चित्रपटात काम करण्यासाठी कलाकरांनी घेतलेल्या मानधनाबाबत...
रिपोर्टनुसार, यशनं केजीएफ चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी यशनं 15 कोटी मानधन घेतलं होतं. पण आता त्यानं मानधनामध्ये दहा कोटींची वाढ केली आहे. केजीएफ चॅप्टर-2 साठी यशनं 25 कोटी मानधन घेतलं आहे. चित्रपटामध्ये संजय दत्तनं अधीरा ही खलनायकाची भूमिका साकारली आहे. अधीरा ही भूमिका साकारण्यासाठी संजय दत्तनं नऊ कोटी रूपये फी घेतली आहे. तर श्रीनिधी शेट्टीनं चित्रपटामध्ये काम करण्यासाठी तीन कोटींचे मानधन घेतलं आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. तिनं या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी 1.5 कोटी फी घेतली आहे.
View this post on Instagram
14 एप्रिल रोजी रिलीज होणार चित्रपट
केजीएफ चॅप्टरः2 हा चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे कथानक प्रशांत नील यांनी लिहिले आहे तर विजय किरागंदूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Oscars 2022 : ऑस्कर गोज टू... ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ड्युन सिनेमाचा डंका; पाहा नॉमिनेटेड आणि विजेत्यांची यादी
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटावर राज्यपालांची अप्रत्यक्षरित्या प्रतिक्रिया, म्हणाले...
- Oscar 2022 : ऑस्कर सोहळ्याला गालबोट, पत्नी जॅडा स्मिथवरील कमेंटमुळे भडकला सुपरस्टार विल स्मिथ, ख्रिस रॉकच्या लगावली कानाखाली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha