The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटावर राज्यपालांची अप्रत्यक्षरित्या प्रतिक्रिया, म्हणाले...
The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटावरून सध्या देशांत दोन गट निर्माण झालेत. यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही अप्रत्यक्षपणे मत व्यक्त केलंय.
The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटावरून सध्या देशांत दोन गट निर्माण झालेत. यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही अप्रत्यक्षपणे मत व्यक्त केलंय. राज्यपालांनी म्हटलं आहे की, 'एरव्ही गल्लीत भांडणं होतात, यात नेते तर अग्रस्थानी असतात. धर्माचा मुद्दा अग्रस्थानी असतो. पण पाकिस्तान, चीन, कोरोना अशा संकटसमयी मात्र सगळेच एकत्र येतात. परंतु असं न करता आपण सर्वांनी नेहमीच एकत्र रहायला हवं, असं झालं तर आपल्यावर कोणतंच संकट येणार नाही.' पुण्याच्या लोणावळ्यात स्वच्छता दूत आणि कोरोना योद्ध्यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आलं. पुरस्कार्थीमध्ये सर्व धर्मियांचा समावेश होता. हीच बाब अधोरेखित करताना राज्यपालांनी हे मत व्यक्त केलं.
राज्यपाल म्हणाले की, 'कोरोनाकाळात संपूर्ण देशात सर्वांनी एकत्र येत काम केलं आहे, हे आपल्या देशाच सौभाग्य आहे. परंतु, इतर वेळी नेतेमंडळी भांडत असतात. मात्र, देशावर पाकिस्तान, चीन यांच्यामुळे संकट येताच सगळे एकत्र येतात. इतर वेळी धर्माच्या आणि इतर कारणावरून लढतील पण संकट येताच सगळे एकत्र येतात. आपण सगळे प्रत्येक वेळी एकत्र राहू असा प्रयत्न करायला हवा. जेणेकरून संकट आलच नाही पाहिजे.'
'द कश्मीर फाईल्स'ची विजयी घोडदौड
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटात काश्मिरी पंडितांवरील अत्याचार अतिशय ठळक पद्धतीने दाखवले आहेत. 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करून इतिहास रचला आहे. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. 2020 आणि 2021मध्ये, ‘द काश्मीर फाइल्स’ हा कोरोना काळातही सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
अनेक राज्यांमध्ये चित्रपट करमुक्त!
‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. देशातील 7 राज्यांनी या चित्रपटाळा करमुक्त घोषित केले आहे. या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात, गोवा, त्रिपुरा आणि कर्नाटक यांचा समावेश आहे. काश्मिरी पंडितांवर झालेला अनन्या आणि हल्ल्यांचे विदारक सत्य सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- MRSAM Missile Test : भारताची हवाई शक्ती वाढली, हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
- West Bengal Violence : बीरभूम हिंसाचार प्रकरणात 21 आरोपी असल्याची सीबीआयची माहिती, 10 जणांचा झाला होता जळून मृत्यू
- Tirupati Bus Accident : तिरुपतीमध्ये भीषण अपघात, लग्न समारंभासाठी निघालेली बस दरीत कोसळली, 7 ठार तर 45 जखमी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha