KGF 2 Box Office Collection Day 8 : आठवड्याभरानंतरही बॉक्स ऑफिसवर ‘रॉकी भाई’चा धुमाकूळ! ‘KGF2’ने जमवला इतका गल्ला!
KGF 2 Box Office Collection : यश व्यतिरिक्त या चित्रपटात संजय दत्त, रवीना टंडन आणि श्रीनिधी शेट्टी देखील मुख्य भूमिकेत दिसले आहेत.
KGF 2 Box Office Collection : सुपरस्टार यशच्या ‘KGF2’ची जादू अजूनही बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. एका आठवड्यात या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. बॉक्स ऑफिसवर याची कमाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आठव्या दिवशीही या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जबरदस्त आहे. हा चित्रपट लवकरच 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. या आठवड्यातही KGF 2 बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे.
व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी KGF Chapter 2चे आठव्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाहीर केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 268.63 कोटींचा व्यवसाय केला आहे.
आठव्या दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला!
‘केजीएफ’ हा कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 53.95 कोटी, दुसऱ्या दिवशी 46.79 कोटी, तिसऱ्या दिवशी 42.90 कोटी, चौथ्या दिवशी 50.35 कोटी, पाचव्या दिवशी 25.57 कोटी, सहाव्या दिवशी 19.14 कोटी, सातव्या दिवशी 16.35 कोटी आणि आठव्या दिवशी 13.58 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे एकूण कलेक्शन 268.63 कोटी झाले आहे.
'केजीएफ 2' चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. 2018मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. यश व्यतिरिक्त या चित्रपटात संजय दत्त, रवीना टंडन आणि श्रीनिधी शेट्टी देखील मुख्य भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटातील मुख्य अभिनेता यशच्या दमदार अभिनयाने लोकांना त्याचे वेड लावले आहे. यशचा ‘केजीएफ 2’ हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
हेही वाचा :
- KGF 2 : हिरो बनायला आला अन् डबिंग आर्टिस्ट म्हणून गाजला! वाचा ‘रॉकी भाई’ला आवाज देणाऱ्या ‘त्या’ मराठमोळ्या व्यक्तीबद्दल...
- Mukta Barve : ‘पुण्यावर पुन्हा एकदा एक भयंकर संकट कोसळलंय’, अभिनेत्री मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत!
- रंगभूमीवरील ऐतिहासिक सुवर्ण पान, ‘रायगडा’वरच रंगला ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटकाचा दमदार प्रयोग!
- Aurangabad : 11 लाखांची पैठणी पटकावण्याचा ध्यास! तहान भूक हरपून औरंगाबादच्या ‘वहिनीं’ची ऑडिशनसाठी भलीमोठी रांग!