एक्स्प्लोर

Mukta Barve : ‘पुण्यावर पुन्हा एकदा एक भयंकर संकट कोसळलंय’, अभिनेत्री मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत!

Mukta Barve : ‘व्हायरस परत आलाय!!!’ असं म्हणत केलेली ही मुक्ता बर्वेची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

Virus 2 Pune : अभिनेत्री मुक्ता बर्वेने (Mukta Barve) मागील अनेक वर्षापासून मालिका, चित्रपट आणि नाटक या माध्यमातून आपले दमदार अभिनय कौशल्याद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यानंतर आता मुक्ता आपल्या अभिनयासोबत आपल्या आवाजाच्या जादूनेही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कथावर्णन करत ती एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आली आहे. काही दिवसापूर्वी 'स्टोरीटेल' मराठीवर तिची ‘Virus -पुणे’ ही एक सीरीज या प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता याचा दुसरा भाग ‘Virus -2 पुणे' घेऊन ती आपल्या भेटीला आली आहे. नुकतीच तिनं याची माहिती देणारी एक पोस्ट केली आहे. सध्या मुक्ताची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

एका जीवघेण्या व्हायरसच्या निमित्तानं पुण्यावर एक भयंकर संकट कोसळलंय. सगळं शहर पत्त्यांसारखं उन्मळून पडत असताना नेहाच्या मुलीला मायराला काही अज्ञात लोकांनी किडनॅप केलंय. मायरापर्यंत पोचण्यात, तिचा शोध घेण्यात नेहा, दिव्या, सचिन यशस्वी होतील? न भूतो न भविष्यती अशा या संकटातून ते खरंच बाहेर पडतील? नियतीचा हा जीवघेणा खेळ खरंच संपेल? ‘Virus-2 पुणे' या स्टोरीटेल मराठी वरील ऑडिओ सीरीज विषयीची ही तिची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. चाहते देखील मुक्ताच्या या नवीन सीरीजबद्दल विशेष उत्साही आहेत.

मुक्ताच्या आवाजात रमले प्रेक्षक!

‘Virus- पुणे’ या मुक्ताच्या सीरीजच्या पहिल्या सीझनला कमाल लोकप्रियता मिळाली होती आणि त्यामुळे दुसऱ्या सीझनची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मुक्ताच्या सीरीजच्या या दुसऱ्या सीझनला देखील स्टोरीटेलवर अद्भुत प्रतिसाद मिळत असून, तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यापूर्वी आलेल्या मुक्ताच्या‘अॅडिक्ट’ या पहिल्या सीरीजलाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. यामध्ये डॉ. रक्षा नावाच्या एका महिलेची गोष्ट सांगण्यात आली होती. जिच्या आयुष्यात ती अशा एका घटनेला सामोरे जाते त्यानंतर त्याचे तिला व्यसन लागते. मात्र, हे काही ड्रग्ज, अल्कोहोल इत्यादींचे व्यसन नाही. तिच्या या विचित्र व्यसनामुळे तिचे आयुष्य रंजक आणि भयानक वळण घेते.

स्विडीश भाषेतील मूळ कथा

तीन ते चार वर्षापूर्वी डॅनियल ऑबर्ग यांनी 'Virus - Stockholm' स्विडीश भाषेत लिहीली. त्यावेळी ती एक परिपूर्ण Sci-Fi सीरीज होती. पण, दोन वर्षांपूर्वी कथेतला काही अंश थेट वास्तवातच आला आणि पहिल्यांदाच Sci-fi genre ची भिती वाटली. त्यामुळे ही सीरीज मराठी भाषेत आली पाहिजे, असं 'स्टोरीटेल मराठी'ला प्रकर्षाने जाणवलं. आठ ते नऊ महिन्याच्या मेहनतीनंतर डिसेंबर 2022ला पहिल्यांदा 'Virus-पुणे' स्टोरीटेलवर रिलीज झाली. निरंजन मेढेकर आणि मोहिनी वाघेश्वरी यांनी काटेकोरपणे स्क्रिप्टवर काम करून प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारं लिखाण केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुक्ता बर्वेने दिलेलं नॅरेशन, मुक्ताच्या आवाजामुळे ही सीरीज आपण ऐकत नसून हे सर्व आपल्या आजूबाजूला घडतंय असं जाणवतं.

'Virus - Stockholm' च्या मराठी भावानुवादावर या मूळ कथेचा लेखक डॅनियल भलताच खुश आहे. त्याला मराठीतील हे सादरीकरण प्रचंड आवडलं आहे आणि विशेष म्हणजे मुक्ता बर्वेच्या दमदार आवाजातील चित्तथरारक ऐकून तो तिचा जबरदस्त फॅन झाला आहे.

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Royals Vs Delhi Capitals: 6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Hardik Pandya: आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Navneet Rana Special Report : महायुतीतल्या नाराजीचं नवनीत राणांसमोर मोठं आव्हानRajan Vichare Lok Sabha Elections : शिवजयंतीच्या मुहूर्तावर राजन विचारेंनी फोडला प्रचाराचा नारळRahul Shewale on Lok Sabha Election : ठाकरेंच्या अनिल देसाईंविरोधात शिवसेनेकडून राहुल शेवाळे मैदानातMVA Meeting for Seating Sharing : मविआच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? जागावाटपाचा तिढा सुटला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: 6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Hardik Pandya: आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Kavya Maran: कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Embed widget