आता BMW मधून फिरतोय, कूकने महागड्या गाडीची मागणी करताच फराह खान म्हणाली 'मी राक्षस निर्माण केलाय'
दिलीपच्या एकावर एक महागड्या मागण्यांवर यात दिलीपच्या पगारवाढीच्या मागणीची फराहने चांगलीच खिल्ली उडवल्याचं दिसलं.(Farah Khan) फराह खान म्हणाला राक्षस निर्माण केलाय असंही फराह म्हणाली.

Farah Khan Cook: बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान कायम तिच्या युट्यूब व्लॉगमधून चर्चेत असते. मास्टरशेफच्या शोमधून प्रेक्षकांसमोर आली आहे. नुकताच तिने टाकलेल्या युट्यूब व्हिडिओची जोरदार चर्चा आहे. यात फराह खान तिच्या कूकसोबत दिसत आहे. दिलीप असं तिच्या कुकचं नाव आहे. पण या व्लॉगमध्ये दिसणाऱ्या दिलीपची सध्या चांगलीच चर्चा आहे. या व्लॉगची सुरुवात दिलीपसोबत होणाऱ्या हलक्याफुलक्या होणाऱ्या संभाषणातून होते. यात फराह आणि दिलीपमधला मजेशीर खेळकर मिश्कील संवाद सध्या प्रेक्षकांच्या आवडीचा विषय ठरलाय. दिलीपच्या एकावर एक महागड्या मागण्यांवर यात दिलीपच्या पगारवाढीच्या मागणीची फराहने चांगलीच खिल्ली उडवल्याचं दिसलं.(Farah Khan) फराह खान म्हणाला राक्षस निर्माण केलाय असंही फराह म्हणाली.
फराहने उडवली दिलीपच्या पगाराची खिल्ली
फराह खानच्या नुकत्याच आलेल्या युट्यूब व्लॉगला सध्या तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. फराह खानच्या किचनमध्ये आजवर अनेकांनी हजेरी लावलीय. नुकत्याच आलेल्या व्हिडिओमध्ये फराहच्या घरी नुतनीकरण सुरु असल्यामुळे त्यांनी कुठे शुट करायचं अशी चर्चा केली.यात फराह आणि दिलीपच्या पगाराबद्दल काही तपशील समोर आल्यानं फराहच्या कूकचा पगार किती? अशी चर्चा सुरु झाली. या व्हिडिओमध्ये सोनू की टिटू की स्विटी फेम सनी सिंग यात येतो. फराह आणि सनी सिंगसोबत स्वयंपाक करताना फराहचा कुकही त्यांच्यात सामिल होतो. आणि सगळेजण काही मजेदार क्षण शेअर करतात. यात फराह सुरुवातीला दिलीपच्या पगारवाढीच्या काही मजेशील कमेंट करताना दिसते. व्लॅाग संपताना आता पुढच्या वेळेस कोणासोबत शूट करणार? असं फराहने विचारताच त्यांनं शाहरुख खान सरांसोबत असं उत्तर दिलं. सेटवर जाण्यासाठी दिलीपनं नवीन गाडी दिली तर जाईन अशी इच्छा व्यक्त केली. यावर फराहने मी एक राक्षस निर्माण केलाय. मी तुला बसचा पास देईन फारतर असं फराह म्हणाली.
फराहच्या कुकची संपत्ती किती?
सध्या, मी बीएमडब्ल्यूने प्रवास करत आहे. आता मी काहीतरी अधिक महाग खरेदी करण्याचा विचार करत आहे.असं दिलीप म्हणाला. न्यूज 18च्या वृत्तानुसार फराह खानचा कुक दिलीप फक्त कुक किंवा फराहच्या युट्यूबचा एक भाग नाही. पण बिहारमध्ये दिलीपचा मोठा तीनमजली बंगला आहे. शेतजमीन, जनावरे अशी त्याची संपत्ती आहे. त्याचा सगळा परिवार तिथे राहतो. दिलीप फराहकडे कुक म्हणून काम करतो.
हेही वाचा:
'अमिताभ बच्चन यांच्यासमोर टॉप काढावा लागेल', दिग्गज अभिनेत्रीसमोर दिग्दर्शकाने ठेवली होती अट


















