एक्स्प्लोर

IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक

IND vs NZ : भारताने 15 व्या षटकात 200 धावांचा टप्पा गाठला होता. मात्र, 16 व्या षटकात भारताच्या धावगतीला ब्रेक बसला. 

भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND VS NZ) यांच्यातील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धुव्वादार फलंदाजी पाहायला मिळाली. भारतीय संघाच्या (Team india) ओपनिंग जोडीने षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करत तडाखेबंद खेळ केला. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने पहिल्या विकेटसाठी अवघ्या 7.1 षटकात 98 धावांची भागिदारी केली. त्यात, अभिषेकने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. 21 चेंडूत 52 धावांची तुफानी खेळी करत अभिषेक पॅव्हेलिनयमध्ये परतला. त्यानंतर, संजूने (sanju samson) धुव्वादार फलंदाजी करत आपलेही अर्धशतक पूर्ण केले. संजूला इशानेही तशीच साथ दिली. त्यामुळे, भारताने 15 व्या षटकात 200 धावांचा टप्पा गाठला होता. मात्र, 16 व्या षटकात भारताच्या धावगतीला ब्रेक बसला. 

जेम्स नीशमने 16 व्या षटकात सामन्याच चित्र पलटवून टाकले, भारत 250+ धावांच्या दिशेने वेगाने धावत असताना या एकाच षटकात तीन दिग्गज फलंदाजांच्या विकेट पडल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला. भारताची धावसंख्या घसरली अन् 16 आणि 17 या दोन षटकांत भारतीय संघाला सर्वात कमी धावा बनवता आल्या. 16 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नीशमने संजू सॅमसनला आऊट केले, सॅमसनने 46 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या जोरावर 89 धावांची तुफानी खेळी केली. मिडऑफच्या वरुन संजूने लगावलेल्या उत्तुंग फटक्याचा बाँड्री लाईनवर झेल टिपला. त्यानंतर षटकाच्या पाचव्या चेंडूवर नीशमने ईशान किशनला चॅपमनकडे झेल देण्यास भाग पाडले. ईशानने 25 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 54 धावा केल्या. तर, षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नीशमने सूर्यकुमार यादवला रचिनच्या हाती झेलबाद करत भारताला तिसरा धक्का दिला. कर्णधार सूर्यकुमार यादव खातेही उघडू शकले नाही, कर्णधार शून्यावर बाद झाला. त्यामुळे, 15 षटकात 203 धावा केलेल्या भारतीय संघाची16 षटकांनंतर 4 बाद 204 अशी अवस्था झाली होती. 

सचिनकडून जेम्सचं कौतुक

भारतीय संघाचा माजी फलंदाज मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही ट्विट करत भारतीय फलंदाजांच्या तुफानी खेळीचं कौतुक केलंय. तर, जेम्स नीशानच्या गोलंदाजीचं कौतुक करायलाही सचिनने मागे पाहिले नाहीत. विशेष म्हणजे, जेम्सच्या षटकात घेण्यात आलेल्या तिन्ही फलंदाजांचे झेल अफलातून होते. त्यामध्ये, संजू सॅमसन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या तिघांचेही झेल सीमारेषेवरच टिपण्यात आले आहेत. सचिनने ट्विट करत या तिन्ही झेलचे कौतुक केलं आहे. दरम्यान, भारतीय फलंदाजांच्या धुव्वादार फलंदाजीच्या जोरावर भारताने 20 षटकात 255 धावांचा डोंगर उभारला.  

हेही वाचा

Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
IND vs SL : सिराज, कृष्णा, गुरनूर ब्रार, आकिब नबी, चारपैकी कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना प्लेईंग XI मध्ये संधी? अजिंक्य रहाणेचा महत्त्वाचा सल्ला
श्रीलंकेविरोधातील पहिल्या कसोटीत कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना संधी? अजिंक्य रहाणेनं दोघांची नाव सांगितली
Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget