Entertainment News Live Updates 24 February : कॅनडाचं नागरिकत्व सोडून भारतीय होणार खिलाडी कुमार
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE

Background
Akshay Kumar : कॅनडाचं नागरिकत्व सोडून भारतीय होणार खिलाडी कुमार
Akshay Kumar On Canada Passport : खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारची (Akshay Kumar) गणना बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत केली जाते. सध्या 'सेल्फी' (Selfiee) या सिनेमामुळे अभिनेता चर्चेत आहे. दरम्यान एका मुलाखतीत अक्षय कुमारने कॅनडाचं नागरिकत्व (Canadian Citizenship) सोडणार असल्यावर भाष्य केलं आहे.
ABP Network Ideas Of India Summit 2023 : 'आयडियाज ऑफ इंडिया समिट'मध्ये आयुष्मान खुरानाची हजेरी
ABP Network Ideas Of India Summit 2023 : 'आयडियाज ऑफ इंडिया समिट' (ABP Network Ideas Of India Summit 2023) हा एबीपी नेटवर्कचा (ABP Network) कार्यक्रम आज पार पडणार आहे. 'नया इंडिया, लुकिंग इनवर्ड, रिचिंग आऊट' अशी या कार्यक्रमाची थिम आहे. 24-25 फेब्रुवारी दरम्यान, हा कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रम अभिनेता आयुष्मान खुरानादेखील (Ayushmann Khurrana) सहभागी होणार आहे.
Javed Akhtar : जावेद अख्तर यांच्या 'त्या' वक्तव्यावर भडकला Ali Zafar; म्हणाला, "तुमच्या बोलण्यानं अनेकांच्या भावना दुखावल्यात"
Ali Zafer On Javed Akhtar : बॉलिवूडचे लोकप्रिय गायक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी पाकिस्तानातील एका कार्यक्रमात "26/11 च्या मुंबई हल्ल्याचे सूत्रधार अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत", असं वक्तव्य केलं आहे. जावेद अख्तर यांच्या या वक्तव्याचं भारतीय मंडळी कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानमधील कलाकार टीका करत आहे. अशातच पाकिस्तानी गायक आणि अभिनेता अली जफरने जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Rakhi Sawant On Adil : "आदिल ड्रायव्हर आहे, झोपडपट्टीत राहतो"; सत्य समोर येता राखी हादरली
Rakhi Sawant On Adil Khan Durrani : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिचा पती आदिल खान दुर्रानीमुळे (Adil Khan Durrani) चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी राखी आदिलसोबत लग्नबंधनात अडकली होती. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री त्याच्या पतीबद्दल नव-नवीन खुलासे करत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत राखी म्हणाली की,"आदिल शोरुमचा मालक नसून ड्रायव्हर आहे".
View this post on Instagram
Sridevi : जाणून घ्या वयाच्या चौथ्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या श्रीदेवींबद्दल...
Sridevi : बॉलिवूडची 'चांदनी' अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या निधनाला (Death Anniversary) पाच वर्षे झाले असले तरी आजही चाहत्यांच्या मनात त्या जिवंत आहेत. श्रीदेवी यांचे पूर्ण नाव 'श्री अम्मा यंगर अय्यप्पन' असे आहे. त्यांनी हिंदीसह, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेंतील सिनेमांत काम केलं आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
