Avatar 2 : ‘अवतार’चा सिक्वेल येणार! दिग्दर्शक जेम्स कॅमेरूननी केली अधिकृत घोषणा
Avatar 2 : दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची घोषणा आधीच केली होती. त्यामुळेच जवळपास दशकभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या सिक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

Avatar 2 : ‘अवतार’ या 2009मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली होती. सामान्य कथा असूनही, केवळ व्हिज्युअल इफेक्ट्सच्या जोरावर ‘अवतार’ (Avatar 2) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. निळ्या रंगाच्या प्राण्यांच्या विश्वावर आधारित या कथेने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली होती. या दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची घोषणा आधीच केली होती. त्यामुळेच जवळपास दशकभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या सिक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता या चित्रपटाचं नाव आणि टीझर-ट्रेलरची घोषणा करण्यात आली आहे.
तब्बल 13 वर्षांनी या चित्रपटाची नवी अपडेट समोर आली आहे. आता चाहते या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या ‘अवतार’ चित्रपटाच्या सिक्वेलचे अधिकृत शीर्षक समोर आले आहे. जेम्स कॅमेरुनच्या ‘अवतार’च्या सिक्वेलला ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ असे नाव देण्यात आले आहे.
स्वतः जेम्स कॅमेरून यांनी ट्विट करत ‘अवतार 2’ची अपडेट दिली आहे. ते म्हणाले, या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर लवकरच रिलीज होईल. हा टीझर 'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’सोबत दाखवण्यात येणार आहे. 'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ हा बहुचर्चित चित्रपट 6 मे 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘अवतार’ हा चित्रपट 2009मध्ये प्रदर्शित झाला होता. तब्बल 13 वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर आता ‘अवतार’च्या सिक्वेलमधून नवा अध्याय सुरू होणार आहे. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’मध्ये आता जेक आणि जो सल्डाना नेटिएरी यांच्या जीवनात पुढे काय घडणार हे दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट 16 डिसेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल असे म्हटले जात आहे.
हेही वाचा :
- Rashmika Mandanna : ‘जर्सी’च नाही, संजय लीला भन्साळींनाही दिलाय नकार! रश्मिकाने नाकारलेयत ‘हे’ ब्लॉकबस्टर चित्रपट!
- PHOTO : शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी मॉडेलिंगकडे वळलेल्या समंथा प्रभूच्या ‘या’ गोष्टी माहितीयेत का?
- Lagan : ‘प्रेम निभावता आलं तर ते जिंकतं’, अभिनेत्री स्मिता तांबेच्या ‘लगन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
