एक्स्प्लोर

Lagan : ‘प्रेम निभावता आलं तर ते जिंकतं’, अभिनेत्री स्मिता तांबेच्या ‘लगन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Lagan : प्रेमात पडण्यापेक्षा प्रेमभावना जपण्यात जास्त सुख असतं, हा मध्यवर्ती विचार देणारा ‘लगन’ (Lagan) हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Lagan : प्रेम हा प्रत्येकाच्या मनाचा हळवा कोपरा असतो. कुणी त्यात आकंठ बुडालेला असतो, तर कुणी त्याच्या चाहुलीने मोहरलेला असतो. कुणाला त्याचे चटकेही बसलेले असतात, पण प्रेमात पडण्यापेक्षा प्रेमभावना जपण्यात जास्त सुख असतं, हा मध्यवर्ती विचार देणारा ‘लगन’ (Lagan) हा मराठी चित्रपट रुपेरी पडद्यावर 6 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा सोहळा नुकताच दिमाखात संपन्न झाला. जी. बी एंटरटेंन्मेंटने या चित्रपटाची निर्मीती केली असून, दिग्दर्शन अर्जुन यशवंतराव गुजर यांचे आहे. ‘लगन’ चित्रपट प्रत्येकाला प्रेमाचा खरा अर्थ दाखवून देईलच सोबत प्रेक्षकांची मने जिंकण्यात नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास सर्व कलाकारांनी याप्रसंगी व्यक्त केला.

लगन.. तुमाला वाटतंय पण सोपं नायी!

‘तुमचं ना..रडू लय जवळ असतं.. अन् तेच आमचा जीव घेतं’..! अशी हळूवार टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात संघर्षावर मात करत प्रेम निभावणाऱ्या प्रेमवीरांची कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. सुजित चैारे आणि श्वेता काळे ही नवी युवा जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. प्रेम आणि नात्यातील भावभावनांचा प्रवास दाखवताना ‘प्रेम निभावता आलं तर ते जिंकतं’ हे सांगण्याचा प्रयत्न ‘लगन.. तुमाला वाटतंय पण सोपं नायी’  ’ या चित्रपटातून करण्यात आला आहे. एका नव्या कोऱ्या जोडीसोबत या चित्रपटात स्मिता तांबे, प्रशांत तपस्वी, शुभम शिंदे,अपेक्षा चलवादे, अनिल नगरकर, रामचंद्र धुमाळ आदि कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

पहा ट्रेलर :

‘लगन’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अर्जुन यशवंतराव गुजर यांनी केलं आहे. चित्रपटाचे छायांकन सोपान पुरंदरे आणि रणजीत माने यांचे आहे. संगीत पी.शंकरम, विजय गवंडे, रोहित नागभिडे यांचे असून अजय गोगावले, आदर्श शिंदे, चिन्मयी श्रीपाद, ओमकारस्वरूप बागडे, पी.शंकरम यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. पार्श्वसंगीत पी.शंकरम तर साऊंड डिझायन विकास खंदारे यांचे आहे. प्रेमाची वेगळी परिभाषा मांडणारा ‘लगन’ 6 मे ला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Vijay Deverakonda : अभिनेता विजय देवरकोंडा बनला 'रामराज कॉटन'चा ब्रँड ॲम्बेसेडर; खास वेडिंग कलेक्शनचा चेहरा
अभिनेता विजय देवरकोंडा बनला 'रामराज कॉटन'चा ब्रँड ॲम्बेसेडर; खास वेडिंग कलेक्शनचा चेहरा
Nana Patekar Death: नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Devendra Fadnavis: पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
Embed widget