Sameer Khakhar: अभिनेते समीर खाखर काळाच्या पडद्याआड; वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अभिनेते समीर खाखर (Sameer Khakhar) यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Sameer Khakhar : अभिनेते समीर खाखर (Sameer Khakhar) यांचे निधन झाले आहे. समीर यांनी मुंबईच्या (Mumbai) पश्चिम उपनगरातील बोरिवली (Borivali) इथल्या राहत्या घरी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. समीर यांनी 'नुक्कड' या 80 च्या दशकातील प्रसिद्ध मालिकेमध्ये 'खोपडी' ही भूमिका साकारली. समीर खक्कर यांचा भाऊ गणेश खाखर यांनी एबीपी न्यूजला समीर यांच्या निधनाची माहिती दिली.
अवयव निकामी झाल्याने निधन
समीर खक्कर यांचे भाऊ गणेश खक्कर यांनी समीर यांच्या मृत्यूच्या कारणांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, समीर खक्कर यांना श्वास घेण्यास त्रास झाला होता आणि त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ढासळत होती. काल (मंगळवार) त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना बोरिवलीच्या एमएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे ते बेशुद्ध पडले आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर आज पहाटे 4.30 वाजता त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. बोरिवलीतील बाभाई नाका स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
समीर खाखर हे मुंबईतील बोरिवली येथील आयसी कॉलनीत एकटेच राहत होता. समीर यांची पत्नी अमेरिकेत राहते.
समीर यांनी मालिका आणि चित्रपटांमध्ये केलं काम
समीर यांनी त्यांच्या 38 वर्षांच्या अभिनय क्षेत्रातील करिअरमध्ये अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांचा काम केले. सलमान खानच्या जय हो मधील भूमिकेमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. समीर यांनी मनोरंजन तसेच शाहरुख खानच्या सर्कस यांसारख्या मालिकांमध्येही काम केले. समीर यांनी मनोरंजन क्षेत्रामधून काही दिवस ब्रेक घेऊन अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ते पुन्हा भारतात आले. भारतात आल्यानंतर त्यांनी दोन गुजराती नाटकांमध्ये काम केलं.
'परिंदा', 'ईना मीना डीका', 'दिलवाले', 'राजा बाबू', 'आतंक ही आतंक', 'रिटर्न ऑफ ज्वेल थीफ', 'अव्वल नंबर', 'प्यार दीवाना होता है', 'हम हैं कमाल के' या चित्रपटांमध्ये समीर यांनी काम केले. काही दिवसांपूर्वी ओटीटीवर रिलीज झालेल्या फर्जी या वेब सीरिजमध्ये देखील समीर यांनी काम केलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
CID मालिकेचे निर्माते प्रदीप उप्पूर यांचे निधन; शिवाजी साटम यांच्याकडून शोक व्यक्त