(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CID मालिकेचे निर्माते प्रदीप उप्पूर यांचे निधन; शिवाजी साटम यांच्याकडून शोक व्यक्त
Pradeep Uppoor : 'सीआयडी' (CID) या लोकप्रिय मालिकेचे निर्माते प्रदीप उप्पूर यांचे निधन झाले आहे.
Pradeep Uppoor Passed Away : सतीश कौशिक यांच्या निधनानंतर 'सीआयडी' (CID) या लोकप्रिय मालिकेचे निर्माते प्रदीप उप्पूर (Pradeep Uppoor) यांचे निधन झाले आहे. प्रदीप यांनी मालिकांसह अनेक सिनेमांची देखील निर्मिती केली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि 'सीआयडी' या मालिकेतील एसीपी प्रद्युम्न अर्थात शिवाजी साटम (Shivaji Satam) यांनी प्रदीप यांच्या निधनाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
शिवाजी साटम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदीप यांच्या निधनाची बातमी दिली आहे. शिवाजी साटम यांनी प्रदीप उप्पूर यांचे फोटो शेअर करत शोक व्यक्त केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"सीआयडीचे आधारस्तंभ आणि निर्माते... नेहमीच हसतमुख असलेला प्रामाणिक मित्र.. तुझ्या जाण्याने आज माझ्या आयुष्यातील एक चॅप्टर संपला आहे... खूप खूप प्रेम".
View this post on Instagram
प्रदीप उप्पूर आणि शिवाजी साटम खास मित्र होते. गेल्या काही वर्षांपासून ते एकत्र काम करत आहेत. त्यामुळे आता प्रदीप यांच्या निधनाने शिवाजी साटम यांना मोठा धक्का बसला आहे. 'सीआयडी' या मालिकेतील अभिनेता नरेंद्र गुप्तानेही प्रदीप यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्याने लिहिलं आहे, "माझं प्रदीपसोबतचं नातं खूपच कमाल होतं. तो माणूस म्हणून खूपच चांगला होता. आज मी माझ्या आयुष्यातला एक चांगला माणूस गमावला आहे."
प्रदीप उप्पूर कोण आहेत? (Who Is Pradeep Uppoor )
'नेल पॉलिश' हा प्रदीप उप्पूर यांचा शेवटचा सिनेमा. दोन वर्षांपूर्वी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्यांचा हा सिनेमा रिलीज झाला होता. प्रदीप उप्पूर हे छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय नाव आहे. त्यांनी 'आहट', 'सीआयडी', 'सुपकॉप्स वर्सेस सुपरविलेन्स', 'सतरंगी ससुराल' सारख्या अनेक मालिकांची निर्मिती केली आहे. मालिकांसह अनेक सिनेमेदेखील त्यांनी बनवले आहेत. त्यामुळे त्यांच्या निधनाने आता मनोरंजनसृष्टीचं खूप मोठं नुकसान झालं आहे.
प्रदीप उप्पूर हे गेल्या काही दिवासांपासून कर्करोगाने त्रस्त होते. सिंगापूरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर मनोरंजनक्षेत्रातील मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.
संबंधित बातम्या