एक्स्प्लोर
सनी लिऑनसोबत अरबाज खान समुद्रकिनारी काय करतोय?
मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल अशी ओळख निर्माण केलेल्या सनी लिऑनचा अरबाज खानसोबतचा एक फोटो सोशल मीडियवर व्हायरल झाला आहे. अरबाज खान आणि सनी लिऑन समुद्रकिनारी बसलेले या फोटोतून दिसतंय.
अरबाज खानने त्याच्या इन्स्टाग्रामवरील ऑफिशियल अकाऊंटवरुन सनी लिऑनसोबतचा फोटो शेअर केला. या फोटोत अरबाज-सनी समुद्रकिनारी बसले आहेत. या फोटोवरुन कुणी काही चुकीचा अर्थ काढू नये म्हणून अरबाजने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "सुंदर सनी लिऑनसोबत 'तेरा इंतजार'च्या सेटवर"
सनी लिऑन आणि अरबाज खान यांच्या आगामी 'तेरा इंतजार' सिनेमात हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. मॉरिशसमध्ये सिनेमाची शूटिंग सुरु आहे. सिनेमादरम्यान मॉरिशसच्या सौंदर्याचा अनुभवही घेताना अरबाज, सनीसह सर्व कलाकार घेत आहेत.
दरम्यान, अरबाज खान आणि पत्नी मलायक अरोरा-खान यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement