Shubman Gill: उर्वशी आणि ऋषभ यांचं अफेअर? शुभमन गिलने सांगितली पंतची 'मन की बात'
शुभमननं (Shubman Gill) काही दिवसांपूर्वी एका पंजाबी शोमध्ये हजेरी लावली. या शोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Shubman Gill: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते. या दोघांच्या नात्याच्या चर्चेवर आता क्रिकेटपटू शुभमन गिलनं (Shubman Gill) मौन सोडलं आहे. शुभमननं काही दिवसांपूर्वी एका पंजाबी शोमध्ये हजेरी लावली. या शोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शोमधील अँकर ही शुभमनला उर्वशी आणि ऋषभ यांच्या नात्याबाबत उर्वशीचं नाव न घेता प्रश्न विचारते त्यानंतर शुभमन हा या प्रश्नाचं उत्तर देतो.
काय म्हणाला शुभमान?
व्हिडीओमध्ये दिसत आहे की कार्यक्रमातची सूत्रसंचालक शुभमनला विचारते, 'सध्या क्रिकेटर ऋषभ पंतला एका अभिनेत्रीच्या नावावरुन चिडवलं जात आहे. टीममधील लोक देखील ऋषभला चिडवतात का?' या प्रश्नाचं उत्तर देत शुभमन म्हणाला, 'ती स्वत:च म्हणते की, मला चिडवा. तिचा काहीही संबंध नसतो. ती काही पण करते आणि म्हणते की मला चिडवा. यावर कार्यक्रमातील सूत्रसंचालक प्रश्न विचारते की, 'यामुळे ऋषभचं लक्ष विचलीत होतं का? यावर शुभमन म्हणतो, 'त्याला काही फरक पडत नाही' शुभमनच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
पाहा व्हिडीओ
Shubhman Gill on Urvashi Rautela🤣 #RishabhPant #shubhmangill pic.twitter.com/7WVGneU5Vb
— Nii🪴☄️ (@11justmythought) November 19, 2022
सारा अली खानसोबत जोडलं जातंय शुभमनचं नाव
क्रिकेटर्सची नावं अनेक वेळा अभिनेत्रींसोबत जोडली जातात. गेल्या काही दिवसांपासून शुभमनचं नाव बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खानसोबत जोडलं जात आहे. साराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, या व्हिडीओमध्ये ती शुभमन गिलसोबत दिसत होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून सारा आणि शुभमन हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. सारा आणि शुभमन हे दोघे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. शुभमन हा क्रिकेटचा सराव करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. तर सारा ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. त्यांच्या नात्याबाबत जाणून घेण्यास त्यांचे चाहते उत्सुक आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Urvashi Rautela: उर्वशी रौतेला पोहोचली ऑस्ट्रेलियाला; नेटकरी म्हणाले, 'ऋषभ पंतच्या मागे गेली...'