(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Urvashi Rautela: उर्वशी रौतेला पोहोचली ऑस्ट्रेलियाला; नेटकरी म्हणाले, 'ऋषभ पंतच्या मागे गेली...'
आता नुकतीच उर्वशीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे आता अनेक नेटकरी उर्वशीला ट्रोल करत आहेत.
Urvashi Rautela: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यातील सोशल मीडिया वॉर नेहमीच चर्चेचा विषय ठरला. उर्वशी आणि ऋषभ यांच्या नात्याची चर्चा देखील जोरदार रंगली होती. आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झालाय. या स्पर्धेत भारतीय संघ त्यांचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 23 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. आता नुकतीच उर्वशीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे आता अनेक नेटकरी उर्वशीला ट्रोल करत आहेत.
एका प्रायव्हेट जेटमधील फोटो उर्वशीनं शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती ब्लॅक आऊटफिट, फंकी शूज आणि गॉगल अशा लूकमध्ये दिसत आहे. फोटो शेअर करुन उर्वशीनं त्याला कॅप्शन दिलं, 'फॉलो माय हार्ट, लेड मी टू ऑस्ट्रेलिया' उर्वशीच्या या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
'सात समुंदर पार मैं तेरे पीछे-पीछे आ गई' अशी कमेंट उर्वशीच्या फोटोवर एका नेटकऱ्यानं केली आहे. तर दुसऱ्या युझर्सनं लिहिलं, 'ऋषभ पंतच्या मागे गेली.' काही नेटकऱ्यांनी उर्वशीला क्रिकेट सामना पहायला न जाण्याचा सल्ला देखील दिला आहे.
उर्वशीची पोस्ट
View this post on Instagram
उर्वशीने 'मिस युनिवर्स' स्पर्धेत 2015 साली भारताचं प्रतिनिधित्व केले. तिने 2015मध्ये 'मिस डिवा युनिवर्स' किताब मिळवला. त्यानंतर उर्वशीने 2013 मध्ये आलेल्या 'सिंग साब द ग्रेट' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती ''सनम रे', 'ग्रेट गँड मस्ती', 'हेट स्टेरी 4' आणि 'पागलपंती' अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Watch Video : ऋषभ पंत आणि उर्वशीमधला वाद मिटला, अभिनेत्री हात जोडून म्हणाली SORRY