Shahrukh khan : किंग इज बॅक! आर्यन खान प्रकरणानंतर शाहरुख खानची पहिली पोस्ट
Shahrukh khan : शाहरुख खानने बऱ्याच दिवसांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्याची इंस्टाग्राम पोस्ट पाहून चाहते खूप खूश झाले आहेत.
Shahrukh khan Post Viral : अभिनेता शाहरुख खान (Shahrukh khan) गेले अनेक दिवस सोशल मीडियापासून दूर आहे. पण तरीदेखील आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे शाहरुख चर्चेत होता. पण आता शाहरुखने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.
शाहरुखने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर आज एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. ज्यात तो एका टीव्ही कंपनीची जाहिरात करताना दिसतोय. या व्हिडीओवर चाहते 'किंग इज बॅक', 'लव्ह यू शाहरुख' अशा कमेंट्स करत आहेत.
View this post on Instagram
आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरण काय आहे?
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सहभागी असल्याने मुंबई पोलिसांनी 3 ऑक्टोबर रोजी त्याला ताब्यात घेतले होते. न्यायालयीन सुनावणी आणि एनसीबीकडून बरीच चौकशी केल्यानंतर आर्यनला 28 ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर
आर्यनची 30 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली होती.
संबंधित बातम्या
Naagin 6 Promo : एकता कपूरच्या 'Naagin 6' चा प्रोमो रिलीज, मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Ranbir Kapoor : रणबीर कपूरचा 'Shamshera' सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित? करण मल्होत्रा म्हणाला...
'नार्को क्वीन' बेबी पाटणकरांच्या आयुष्यावर आधारित वेब सिरीज, समित कक्कड सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha