Ranbir Kapoor : रणबीर कपूरचा 'Shamshera' सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित? करण मल्होत्रा म्हणाला...
Ranbir Kapoor : 'शमशेरा' चित्रपट 18 मार्च 2022 मध्ये हा चित्रपट जगभर प्रदर्शित होणार आहे.
Shamshera : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय 'रणबीर कपूर'चा (Ranbir Kapoor) 'शमशेरा' (Shamshera) सिनेमा 18 मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा सिनेमा निर्माते ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा यांनी केले आहे.
करण मल्होत्रा चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी म्हणाला, "शमशेरा सिनेमा आदित्य चोप्राचा आहे. ते एक उत्तम निर्माते आहेत. त्यामुळे सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करायचा की सिनेमागृहात करायचा याचा निर्णय ते घेतील. मीदेखील 'शमशेरा' सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. मला आशा आहे की, सिनेमा लवकरच प्रदर्शित होईल".
View this post on Instagram
करण मल्होत्रा दिग्दर्शित या चित्रपटाची कथा 1800 च्या उत्तरार्धावर आधारित आहे. सिनेमात डाकू आदिवासी आपल्या हक्क आणि स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढताना दिसणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर, वाणी कपूर आणि ज्येष्ठ अभिनेते संजय दत्त यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 18 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या
'नार्को क्वीन' बेबी पाटणकरांच्या आयुष्यावर आधारित वेब सिरीज, समित कक्कड सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा!
Panghrun Movie : अखेर प्रतिक्षा संपली, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'पांघरूण'
Fardeen Khan Corona Positive : फरदीन खानला कोरोनाची लागण, ट्वीट करत दिली माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha






















