एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'नार्को क्वीन' बेबी पाटणकरांच्या आयुष्यावर आधारित वेब सिरीज, समित कक्कड सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा!

Narco queen Shashikala Patankar : ‘नार्को क्वीन’ शशिकला उर्फ बेबी पाटणकर (Shashikala Patankar) यांच्या जीवनावर आधारित असलेल्या आगामी वेब सिरीजची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

Narco queen Shashikala Patankar : ‘नार्को क्वीन’ शशिकला उर्फ बेबी पाटणकर (Shashikala Patankar) यांच्या जीवनावर आधारित असलेल्या आगामी वेब सिरीजची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध फिल्ममेकर संजय गुप्ता यांच्या व्हाईट फेदर फिल्म्सच्या बॅनरखाली या वेब सिरीजची निर्मिती करण्यात येणार आहे. या वेब सिरीजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी समित कक्कड (Samit kakkar) आणि संजय गुप्ता (Sanjay Gupta) सांभाळणार आहेत. समित यांनी आजवरच्या आपल्या चित्रपटांमधून खऱ्या मुंबईचं दर्शन घडवलं आहे.

चित्रपट व्यवसायातील सुमारे दोन दशकांच्या आपल्या प्रवासात, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक समित कक्कड यांनी पडद्यामागे स्थिरावत दिग्दर्शकाच्या रूपात आपली एक वेगळी इमेज तयार करण्यात यश मिळवलं आहे. 'आश्चर्यचकित', 'हाफ तिकीट', 'आयना का बायना' या चित्रपटांसोबतच 'इंदोरी इश्क' हा वेब शो आणि सध्या निर्मिती प्रक्रियेत असलेल्या 'धारावी बँक'मध्ये समित यांचं मुंबईवरील प्रेम हा कॅामन फॅक्टर पहायला मिळतो. वादग्रस्त बार डान्सर स्वीटीवरील बायोपिकचं दिग्दर्शनही समित करत आहेत.

मुंबई शहराच्या प्रेमात असलेले समित म्हणातात की,"हे थोडंसं विचित्र वाटलं तरी मी किशोरवयीन असल्यापासून अनपेक्षितपणे यासारख्या विषयांकडे आकर्षित झालो होतो, तेव्हा मी कॉलेजमध्येही नव्हतो. तेव्हाही बार डान्सर्स, गुंड, पानवाले... प्रत्येकाची आपली एक वेगळी स्टोरी होती, जी तुमचे अनुभव समृद्ध करत असते. मुंबई शहराच्या या अंतरंगाने मला नेहमीच आकर्षित केलं आहे. आजही या कथा जणू सोन्याची खाण आहेत. आपल्याला फक्त आपले कान उघडे आणि पाय जमिनीवर ठेवावे लागतात. मी बऱ्याच वर्षांपासून बार डान्सर्स, गँगलीडर्स यांसारख्या समाजातील घटकांना फॉलो करत होतो. त्यामुळं जेव्हा मी माझं स्वतःचं कंटेंट तयार करू लागलो, तेव्हा माझ्या गाठीशी जमा झालेल्या अनुभवांना आपोआप वाचा फुटणं स्वाभाविक होतं."

मागील काही दशकांपासून चित्रपट निर्मात्यांना मुंबई शहराच्या जडणघडणीतील विविध घटकांनी भुरळ घातली आहे, ज्यात या अंडरबेलीचाही समावेश आहे. मुंबईच्या अंडरबेलीनंच अधिक आकर्षित करण्याबाबत सविस्तरपणे सांगताना समित म्हणाले की, ‘इथे तुम्हाला भेटणाऱ्या व्यक्तिरेखा तुमची विचारसरणी कायमची बदलणारी ठरतील. वरवर पाहता खूपच झगमगीत दिसणाऱ्या या शहराच्या अंधाऱ्या वास्तवाने माझ्या मनात कुतूहल जागवलं. माझ्या आशयातील सर्व व्यक्तिरेखा, सेटिंग्ज आणि चित्रण वास्तविक अनुभवातून आलेलं आहे. स्वीटीच्या जीवनावर आधारित असलेली पुष्कराज आणि शशिकला पाटणकर यांच्या जीवनावरील कथा हे दोन्ही आकर्षक असून, आपल्या प्रेक्षकांना त्यांनी यापूर्वी न पाहिलेले या शहराचे पैलू दाखवणाऱ्या ठरतील.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
Embed widget