एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Salman Khan visits Sabarmati Ashram : 'अंतिम' सिनेमाच्या प्रमोशनसाठी भाईजान थेट बापूंच्या आश्रमात, चरखा चालवत म्हणाला...

'अंतिम' सिनेमाच्या प्रमोशनसाठी सलमान खानने महात्मा गांधीजींच्या साबरमती आश्रमात भेट दिली आहे. दरम्यान सलमानने चरखादेखील चालवला आहे.

Salman Khan visits Sabarmati Ashram : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा (Salman Khan) 'अंतिम' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. सिनेमाचे जोरदार प्रमोशनदेखील सुरू आहे. अशातच भाईजानने थेट अहमदाबादला महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमाला भेट दिली आहे. दरम्यान सलमान खानने बापूंचा चरखादेखील चालवला आहे. 

सलमान खान चरखा चालवतानाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चरखा चालवताना सलमान अत्यंत उत्साहात दिसत आहे. आश्रमाला भेट देऊन निघताना सलमानने व्हिजिटर बुकमध्ये आपला अभिप्राय लिहिला आहे. अभिप्राय देत सलमान खानने लिहिले आहे,"मला या आश्रमात यायला खूप आवडले. हा अनुभव मी कधीच विसरणार नाही. मी पहिल्यांदाच अशा ठिकाणी भेट दिली आहे. मला पुन्हा एकदा आश्रमात भेट द्यायला आवडेल".  

स्वातंत्र्यलढ्याचे मुख्य केंद्र असलेल्या महात्मा गांधीजींच्या निवासस्थानी 'हृदय कुंज'लादेखील सलमान खानने भेट दिली. आश्रमाने त्यांच्या परंपरेनुसार सलमानचे स्वागत करताना त्याला कापसाचा हार घातला. सलमान खानने 'अंतिम' सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा अवलंब केला आहे. 

सलमान खानचा 'अंतिम : द फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) सिनेमा 26 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. अंतिम : द फायनल ट्रुथ' हा सिनेमा 'मुळशी पॅटर्न' या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 'अंतिम' सिनेमात सलमान खान एका शूर पोलिसाच्या भूमिकेत दिसतो आहे. तर सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा गुंडाच्या भूमिकेत दिसतो आहे. या सिनेमाच्या माध्यमातून महिमा मकवानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केले आहे. 

संबंधित बातम्या

Antim Release : थिएटरमध्ये आतिषबाजीनंतर आता Salman Khan च्या पोस्टरवर दुधाचा अभिषेक, व्हिडीओ होतोय व्हायरल

Atrangi Re Song Chaka Chak Out : Sara Ali Khan च्या 'अतरंगी रे' सिनेमातील 'चका चक' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding: विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नाचा मुहूर्त ठरला; वऱ्हाड्यांची यादीही ठरली

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 02 December 2024Girish Mahajan Meet Eknath Shinde : भाजपचे संकटमोचक एकनाथ शिंदेंच्या भेटीला, चर्चांना उधाणEknath Shinde News : एकनाथ शिंदे खरंच नाराज आहेत? मागील वक्तव्य आणि आताची भूमिकेने चर्चांना उधाणABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 02 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
Embed widget