(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding: विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नाचा मुहूर्त ठरला; वऱ्हाड्यांची यादीही ठरली
Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding: विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. संगीत आणि मेहंदीच्या कार्यक्रमांची तयारी सुरू आहे.
Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding : विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अद्याप कतरिना आणि विकीने लग्नासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दोघांच्या लग्नाबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता दिसून येत आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
लग्नसोहळा साधसुधा नसून अत्यंत शाही पद्धतीने पार पडणार आहे. कतरिना आणि विकीचा विवाह सोहळा 700 वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात पार पडणार आहे. विवाहासाठी सवाई माधोपूर येथील एक रिसॉर्ट बुक करण्यात आला आहे. लग्नसोहळ्यात कोणते पाहुणे हजेरी लावणार हेदेखील ठरले आहे. कतरिना-विकी कौशलच्या लग्नात जवळपास 200 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. दिग्दर्शक शशांक खेतान देखील कतरिना-विक्कीच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. शशांकच्या 'गोविंद मेरा नाम' सिनेमात विकी मुख्य भूमिकेत असणार आहे.
View this post on Instagram
कतरिना-विकीच्या लग्नाला करण जोहरदेखील उपस्थित राहणार आहे. करणसोबतच झोया अख्तर, फराह खानदेखील या लग्नासोहळ्यात सहभागी होणार आहे. विराट कोहली, अनुष्का शर्मा देखील मुलगी वामिकासह विकी-कतरिनाच्या लग्नात सहभागी होणार आहेत. विकी-कतरिनाच्या लग्नात फोटो लीक होऊ नयेत म्हणून पाहुण्यांसाठी मोबाईल फोन पॉलिसी असणार आहे.
View this post on Instagram
विकी कतरिनाच्या लग्नाला सलमान खान उपस्थित राहणार नाही. दरम्यान सलमान दबंगच्या शूटिंगमध्ये व्यस्त असला तरी त्याची बहीण अर्पिता खान कतरिनाच्या लग्नात सहभागी होणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha