Atrangi Re Song Chaka Chak Out : Sara Ali Khan च्या 'अतरंगी रे' सिनेमातील 'चका चक' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
Chaka Chak Song Out : अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खानच्या आगामी 'अतरंगी रे' सिनेमातील 'चका चक' हे गाणं प्रदर्शित झाले आहे.
Atrangi Re First Song Out : अक्षय कुमार (Akshay Kumar), धनुष (Dhanush) आणि सारा अली खानच्या (Sara Ali Khan) आगामी 'अतरंगी रे' (Atrangi Re) सिनेमातील 'चका चक' (Chaka Chak) हे गाणं प्रदर्शित झाले आहे. हे गाणे श्रेया घोषालने गायले आहे. या गाण्यची गंमत म्हणजे सारा तिच्या नवऱ्याच्या साखरपुड्यात नृत्य करताना दिसणार आहे. नुकताच सिनेमाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता सिनेमातील 'चका चक' गाणे प्रदर्शित झाले आहे.
गाण्याच्या सुरुवातील सारा म्हणते,"नवऱ्याच्या साखरपुड्याच नाचणारी मी या देशातील पहिलीच पत्नी असेल". इतकंच नाही तर त्यानंतर सारा साखरपुड्यात नाचताना दिसणार आहे. श्रेया घोषालच्या आवाजाचे चाहते कौतुक करत आहेत. सिनेमाच्या माध्यमातून सारा अली खान पहिल्यांदाच धनुष आणि अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
ए आर रहमानने (A R Rahman) 'चका चक' हे गाणे संगीतबद्ध केले आहे. इरशाद कामिल यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खानचा आगामी 'अतरंगी रे' सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. डिज्नी हॉटस्टारवर 24 डिसेंबर 2021 रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सारा अली खान रिंकू सूर्यवंशीच्या भूमिकेत दिसणार आहे. 'अतरंगी रे' सिनेमात अक्षय कुमार अनोख्या अंदाजात एन्ट्री करणार आहे.
संबंधित बातम्या
Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding: विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नाचा मुहूर्त ठरला; वऱ्हाड्यांची यादीही ठरली
Virat-Anushka : Virat Kohli ने Anushka Sharma साठी सोशल मीडियावर लिहिली रोमॅंटिक पोस्ट
Ranveer Singh : रणवीर सिंगने शेअर केले '83' सिनेमाचे पोस्टर, ट्रेलर या दिवशी होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha