एक्स्प्लोर

Antim Release : थिएटरमध्ये आतिषबाजीनंतर आता Salman Khan च्या पोस्टरवर दुधाचा अभिषेक, व्हिडीओ होतोय व्हायरल

Antim Release : सलमान खानच्या पोस्टरवर चाहते दुधाचा अभिषेक करत आहेत. त्यामुळे सलमान खानने चाहत्यांना खास विनंती केली आहे.

Salman Khan Fans On Antim Release : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा (Salman Khan) 'अंतिम' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरदेखील सलमान खानची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. सलमान खानच्या सिनेमाची गेले अनेक दिवस चाहते प्रतिक्षा करत होते. मालेगावच्या थिएटरमध्ये फटाक्यांची आतिषबाजी केल्यानंतर सलमान खानच्या पोस्टरवर चाहते दूधाचा अभिषेक करत आहेत. सलमानच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सलमान खानने चाहत्यांना खास विनंती केली आहे. 

सलमान खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये सलमानचे चाहते त्याच्या पोस्टरवर दूधाचा अभिषेक करत आहेत. एवढेच नव्हे तर ढोल ताशे घेऊन सलमानच्या पोस्टरसमोर चाहते नाचत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत सलमान खानने चाहत्यांना विनंती केली आहे,"अनेक लोकांकडे पाणी नाही आणि तुम्ही असे दूध वाया घालवत आहात. जर तुम्हाला दूध द्यायचेच असेल तर माझी सर्व चाहत्यांना विनंती आहे, ज्या गरीब मुलांना दूध प्यायला मिळत नाही, त्यांना द्या".

View this post on Instagram
 
A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमानच्या चाहत्यांनी चित्रपटगृहात गोंधळ घालत फटाक्यांची आतिषबाजी केली. या संपूर्ण प्रकारामुळे मोठा गोंधळ उडाला होता. या प्रकरणावर सलमान खान म्हणाला होता,"सिनेमागृहात फटाके घेऊन जाऊ नका. आगीमुळे तुमच्यासह इतरांचादेखील जीव धोक्यात येऊ शकतो. माझी थिएटर मालकांना विनंती आहे, फटाके सिनेमागृहात नेण्यास परवानगी देऊ नये. सिनेमाचा आनंद घ्या. पण सिनेमागृहात फटाक्यांची आतिषबाजी करणं कृपया टाळा".

सलमान खानचा 'अंतिम : द फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) सिनेमा 26 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. अंतिम : द फायनल ट्रुथ' हा सिनेमा 'मुळशी पॅटर्न' या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 'अंतिम' सिनेमात सलमान खान एका शूर पोलिसाच्या भूमिकेत दिसतो आहे. तर सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा गुंडाच्या भूमिकेत दिसतो आहे. या सिनेमाच्या माध्यमातून महिमा मकवानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केले आहे. 

संबंधित बातम्या

Antim : सलमानच्या चाहत्यांचा तुफान राडा... मालेगावमध्ये थिएटरमध्येच लावली फटाक्यांची माळ

Bigg Boss 15 : Rakhi Sawant आणि तिचा पती आमने-सामने येणार, बिग बॉसच्या घरात मिळाली वाईल्ड कार्ड एन्ट्री

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणीManjili karad PC : मी मराठा असल्याने जरांगेंनी मला न्याय द्यावा; वाल्मिक कराडच्या पत्नीचं आवाहनWalmik Karad Custody : वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलासह समर्थकांचा राडा | VIDEOPM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget