Lagan : 'लगन' सिनेमाचे धमाकेदार मोशन पोस्टर प्रदर्शित
Lagan : 'लगन' सिनेमा 6 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Lagan : प्रेम म्हणजे नाजूक, अलवार अनुभूती. हळुवार, नाजूकतेने प्रत्येकाच्याच आयुष्यात येणारे हे प्रेम प्रत्येकालाच हवे असते. प्रेमाचा प्रतीक असलेला गुलाब मात्र या प्रेमाचा खरा अर्थ सांगून जातो. जेवढे नाजूक फुल तेवढेच बोचरे काटे. अर्थात प्रेम करणे सोपे पण निभावणे अतिशय कठीण. प्रेमाची वाट बिकट असली तरी धरलेली साथ शेवटपर्यंत निभावयाला लागणाऱ्या हिंमतीची गोष्ट घेऊन आलेल्या 'लगन' (Lagan) या मराठी सिनेमाचे धमाकेदार मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
'तुमचं ना.. रडू लय जवळ असतं.. अन् तेच आमचा जीव घेतं'..! अशी हळूवार टॅगलाईन असलेल्या या पोस्टर मध्ये उधळलेल्या घोडयावरून नववधूच्या वेशातल्या नायिकेला घेऊन जात असलेला जखमी नायक आपल्याला दिसतो. सभोवतालचं वातावरण आणि त्याला असणारी आक्रमक पार्श्वसंगीताची जोड त्याला अजून प्रभावी बनवत आहे. जी. बी एंटरटेंन्मेंट निर्मित आणि अर्जुन गुजर दिग्दर्शित ‘लगन’ हा मराठी सिनेमा 6 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अनेक संकटं जरी समोर आली तरी... प्रेम खरं असले की ती ओलांडण्याचे सामर्थ्यदेखील आपोआपच प्राप्त होतं. नायक आणि नायिकेच्या फुललेल्या एका प्रेमकथेची आणि स्वप्नांची हीच गोष्ट ‘लगन.. तुमाला वाटतंय पण सोपं नायी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘प्रेम निभावता आलं तर ते जिंकतं’ हे सांगण्याचा प्रयत्न ‘लगन’ या सिनेमाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सुजित चौरे आणि श्वेता काळे ही नवी जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘लगन’ या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन अर्जुन गुजर यांनी केलं आहे. चित्रपटाचे छायांकन सोपान पुरंदरे आणि रणजीत माने यांचे आहे. संगीत पी.शंकरम, विजय गवंडे, रोहित नागभिडे यांचे असून अजय गोगावले, आदर्श शिंदे, चिन्मयी श्रीपाद, ओमकारस्वरूप बागडे, पी.शंकरम यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. पार्श्वसंगीत पी.शंकरम तर साऊंड डिझायन विकास खंदारे यांचे आहे.
संबंधित बातम्या
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
RRR Box Office : राजामौलींच्या 'आरआरआर'ने पाच दिवसांत केला 100 कोटींचा टप्पा पार
Star Pravah Pariwar Award 2022 : स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शकांचा होणार विशेष सन्मान
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha