![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
RRR Box Office : राजामौलींच्या 'आरआरआर'ने पाच दिवसांत केला 100 कोटींचा टप्पा पार
RRR : 'आरआरआर' सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे.
![RRR Box Office : राजामौलींच्या 'आरआरआर'ने पाच दिवसांत केला 100 कोटींचा टप्पा पार Rajamouli RRR crossed the 100 crore mark in five days RRR Box Office : राजामौलींच्या 'आरआरआर'ने पाच दिवसांत केला 100 कोटींचा टप्पा पार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/30/f3b4c9215ad0605de52fd1546103cec0_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
RRR Box Office : एस.एस. राजामौली यांचा (SS Rajamouli) 'आरआरआर' (RRR) सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. हा सिनेमा 25 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.
'आरआरआर' हा सिनेमा 25 मार्च रोजी तेलुगू, हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. सोमवारपर्यंत या सिनेमाने 91.50 कोटींचा गल्ला जमवला होता. 100 कोटींचा टप्पा पार करणारा हा 2022 वर्षातला सर्वात जलद सिनेमा आहे. आतापर्यंत या सिनेमाने 107.59 कोटींची कमाई केली आहे.
View this post on Instagram
2022 मध्ये आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी','द कश्मीर फाइल्स' आणि 'आरआरआर' या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. द काश्मीर फाइल्सला 100 कोटींचा आकडा पार करण्यासाठी आठ दिवस लागले होते. 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाला 13 दिवस लागले होते. पण 'आरआरआर' सिनेमाने अवघ्या पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.
संबंधित बातम्या
Aryan Khan : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनसीबीला मिळणार का मुदतवाढ? उद्या निर्णय
Documentary : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'गोपाळ नीलकंठ दांडेकर - किल्ले पाहिलेला माणूस' माहितीपट देशभरात होणार प्रदर्शित
Bawaal : वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा 'बवाल' लवकरच होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)