एक्स्प्लोर

Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate: राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धावत सुटल्या, नेमकं काय घडलं?, VIDEO

Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate: आज सकाळी शायना एनसी पतीसह सचिन तेंडुलकरांचा पुत्र अर्जुन तेंडुलकर यांच्या विवाह सोहळ्याला मुंबईत उपस्थित होत्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पोहोचले होते.

Shaina NC Meet Eknath Shinde: राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आता अवघे तीन तास बाकी आहेत. मात्र अजूनही शिवसेनेचा सस्पेन्स कायम आहे. शिवसेनेनं अजूनही उमेदवारांची नावं जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. राज्यसभेच्या एका जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena Shinde Group) ऐनवेळी इच्छुकांची गर्दी (Rajya Sabha Election 2026) पाहायला मिळत आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी शिवसेनेत ज्येष्ठ नेत्यांपासून अनेक माजी खासदार इच्छुक असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निर्णय घेण्यात उशीर होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

राज्यसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या शायना एनसी देखील इच्छुक आहे. आज सकाळी शायना एनसी पतीसह सचिन तेंडुलकरांचा पुत्र अर्जुन तेंडुलकर यांच्या विवाह सोहळ्याला मुंबईत उपस्थित होत्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पोहोचले होते. यावेळी शायना एसनी आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली. काही सेकंद दोघांमध्ये बोलणं झाल्याचं दिसून आले. 

एकनाथ शिंदेंचा ताफा निघताच शायना एनसी पळत सुटल्या- (Shaina NC Meet Eknath Shinde)

राज्यसभेच्या तिकिटासाठी लग्नमंडपातून शायना एनसी यांची धावपळ पाहायला मिळाली.  शिंदेंचा ताफा अर्जुन तेंडुलकरच्या लग्नातून निघताच शायना एनसी एकनाथ शिंदेंच्या गाडी मागे धावताना पाहायला मिळाल्या. शायना एनसी यांनी आधी गाडी थांबवून शिंदेंसोबत संवाद साधला. पण उपमुख्यमंत्र्यांचा दिनक्रम असल्याने ताफा पुढे सरकला आणि त्या ताफ्यामागे शायना एनसीही धावत निघाल्या.

गजानन किर्तीकर, आनंदराव अडसूळही राज्यसभेसाठी इच्छुक- (Shivsena Rajya Sabha Candidate)

राज्यसभेच्या एका जागेसाठी माजी खासदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर आणि आनंद अडसूळ हे इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे. दोन टर्म खासदार राहिलेल्या गजानन किर्तीकर यांनी यंदा लोकसभेत उमेदवारी न स्विकारता रविंद्र वायकर यांना पाठिंबा दिला. सिटिंग सीट सोडल्याने गजानन किर्तीकर यांनी राज्यसभेसाठी आपला विचार करावा असा प्रस्ताव शिंदेंना दिल्याचे कळते. तर शिवसेना फूट पडल्यानंतर पक्षात शिंदेसोबत आलेल्या माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल हे पद देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते शक्य न झाल्याने पक्षाने आता राज्यसभेसाठी विचार करावा अशी गळ अडसूळ यांच्याकडून एकनाथ शिंदेंना घातली गेल्याचे कळते. तर दुसरीकडे नाशिकचे शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे आणि कोल्हापूरचे माजी खासदार संजय मंडलिक यांनीही आज शिंदेंची नंदनवनला भेट घेऊन खासदारकीबाबत इच्छा दर्शवल्याचे समोर आले आहे. (Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate)

राहुल शेवाळे यादीत पहिल्या क्रमांकावर- (Rahul Shewale, Sanjay Nirupam)

काँग्रेसला सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत आलेले माजी खासदार संजय निरुपम सुद्धा पुन्हा दिल्लीत जाण्याची इच्छा व्यक्त केली असून ते सुद्धा विधानसभेत पराभूत झाल्यानंतर राज्यसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत. दुसरीकडे पहिल्यादिवसापासून शिवसेने कार्यरत असलेले शिवसेनेचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांचेही नाव या यादीत पहिले आहे. राहुल शेवाळे यांच्यावर दिल्लीतील पक्षाचे नाव आणि चिन्हासंदर्भात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईची तर दुसरीकडे मुंबई महापालिकेची जबाबदारी सोपवली होती. दोन्ही जबाबदाऱ्या राहुल शेवाळेंकडून व्यवस्थित हाताळल्या असल्याने त्यातच एकनाथ शिंदेंच्या ते मर्जीतले आहेत. शिवाय तरुण उच्चशिक्षित म्हणून पक्षाची राज्यसभेतील जबाबदारी ते व्यवस्थित हाताळतील हा विश्वास असल्याने राहुल शेवाळे या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. याशिवाय प्रवक्त्या शायना एनसी, आणि प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचीही नावे चर्चेत आहेत. उमेदवारी दाखल करण्याच्या पूर्वसंध्येला अनेक इच्छुकांनी मुख्यनेता एकनाथ शिंदेंना नंदनवन या शासकीय बंगल्यावर भेट घेत आपली इच्छा बोलून दाखवली.

राज्यसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून कोणकोण इच्छुक, संपूर्ण यादी- (Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate)

  1. राहुल शेवाळे
  2. शायना एनसी
  3. ज्योती वाघमारे
  4. संजय निरुपम
  5. गजानन किर्तीकर
  6. आनंदराव अडसूळ 
  7. हेमंत गोडसे 
  8. संजय मंडलिक

संबंधित बातमी:

Rajya Sabha Election 2026: राज्यसभेत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन; राज्यसभेसाठी 2 उमेदवार देणार, नेमकं काय घडतंय?

Rajya Sabha Election 2026 Maharashtra Candidate Full List: भाजप, शिवसेना, ठाकरे गटपासून दोन्ही राष्ट्रवादीपर्यंत...राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून कुणाला उमेदवारी?, पाहा संपूर्ण यादी...

About the author अजय माने

अजय माने
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara : एकनाथ शिंदेंच्या सभेच्या बॅनरवरुन महेश शिंदेंचा फोटो गायब, पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा
एकनाथ शिंदेंच्या सभेच्या बॅनरवरुन महेश शिंदेंचा फोटो गायब, पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा
NCP Sangli News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष उफाळला; 35 पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षांकडे दिले राजीनामे, नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष उफाळला; 35 पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षांकडे दिले राजीनामे, नेमकं प्रकरण काय?
Ratnagiri Bauxite Mining Project: बागायतींपासून पाण्यापर्यंत सर्वकाही धोक्यात, गंभीर आजारांचंही सावट, रत्नागिरीतील बॉक्साईट प्रकल्पाला ठाकरे गटाचा तीव्र विरोध, कोकणात पुन्हा 'रिफायनरी'सारखा लढा?
बागायतींपासून पाण्यापर्यंत सर्वकाही धोक्यात, गंभीर आजारांचंही सावट, रत्नागिरीतील बॉक्साईट प्रकल्पाला ठाकरे गटाचा तीव्र विरोध, कोकणात पुन्हा 'रिफायनरी'सारखा लढा?
Vijay Wadettiwar on Navneet Rana: 'नवनीत राणा जातीय विष पसरवणारी विषवल्ली', विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका, 'हिरवे साप' म्हणत राणांचा पलटवार
'नवनीत राणा जातीय विष पसरवणारी विषवल्ली', विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका, 'हिरवे साप' म्हणत राणांचा पलटवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
Embed widget